आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कुडाळ येथे स्थलांतरित करा

🛑 कुडाळ उपविभागीय कार्यालय ओरोस मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांची होतेय गैरसोय..!

🛑 प्रसाद गावडेंनी पत्राद्वारे वेधले मुख्य कार्यकारी अधिकारी व कुडाळ गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२६:- कुडाळ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त झालेल्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी वं गटविकास अधिकाऱ्यांकडे करत नागरिकांना होणाऱ्या गैरसोईकडे लक्ष वेधले आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अखत्यारीतील व पंचायत समिती कुडाळ अधिनस्त ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कुडाळ कार्यालय हे मागील अनेक दिवसांपासून ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे मुक्कामी आहे. सदरचे कार्यालय पंचायत समिती कुडाळ कार्यालयाच्या परिसरात कार्यरत असणे लोकाभिमुख कामकाजाच्या दृष्टीने योग्य व तालुक्यातील नागरिकांना दिलासा देणारे ठरणारे होते मात्र सदर कार्यालय जागे अभावी ओरोस, सिंधुदुर्गनगरी मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांसाठी प्रचंड क्लेशदायक व गैरसोयीचे ठरत आहे. याबाबत अनेकवेळा कुडाळ तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाचे लक्ष देखील वेधण्यात आले, मात्र
“ जागेची उपलब्धता नाही ” हे कारण देवून अधिकारी वर्गाकडून त्याकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक करण्यात आलेली आहे. आजमितीस कुडाळ पंचायत समिती कार्यालय आवारातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुडाळ ग्रामीण रुग्णालय आवारात नव्या जागेत स्थलांतरीत झाले असून सदरची जागा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कुडाळ कार्यालयासाठी उपलब्ध होवू शकते असे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय व लोकाभिमुख जलद प्रशासकीय कारभाराची आवश्यकता लक्षात घेवून ओरोस,सिंधुदुर्गनगरी मुक्कामी उपविभाग कुडाळ कार्यालय आपल्या कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त जागेत स्थलांतरीत करण्यात यावे अशी आग्रही मागणी गावडेंनी केली आहे.

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी


________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!