उबाठा’कडून अमित शहा यांचा निषेध
*🛑उबाठा’कडून अमित शहा यांचा निषेध*
*🛑संविधान मान्य नसल्यानेच भाजपकडून अशी वक्तव्ये – सतीश सावंत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि- २१:-* केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनुद्गार काढून अपमान केल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे निदर्शने करत हा निषेध करण्यात आला. संविधान बदलासाठी भाजपचे ४०० पारचे स्वप्न भंग पावल्यानेच त्यांच्या मनात चीड आहे. डॉ. आंबेडकर व संविधान मान्य नसल्याने भाजपकडून अशी वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही उबाठाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला.
महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, संजय कदम, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, संजना कोलते, हेलन कांबळे, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर, योगेश मुंज, प्रदीप सावंत, राजू राठोड, अजित काणेकर, तात्या निकम, बाबू केणी, जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
शहा यांनी राजीनामा देण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. सतीश सावंत म्हणाले, शहा हे गृहमंत्री आहेत, ते डॉ आंबेडकर यांच्या संविधानामुळेच. संविधानामुळेच लोकशाही जिवंत आहे. संविधानामुळेच देश लोकशाहीच्या मार्गाने जात आहे. मात्र, शहा यांच्या वक्तव्यातून सुविधांबाबत, डॉ. आंबेडकरांबाबतचा द्वेष दिसून आला. त्यामुळे या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. त्यांना बाबासाहेबांबाबत आस्था असेल, तर त्यांनी दोन दिवसांत राजीनामा देऊन प्रेम व्यक्त करावे.
नीलम पालव म्हणाल्या, संविधानामुळेच सर्वसामान्य जनतेला न्याय, हक्क प्राप्त झाले आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढणे हे निषेधार्ह आहे. या मनुवादी विचारसरणीचा आम्ही निषेध करतो.
संदीप कदम म्हणाले, डॉ.आंबेडकरांमुळेच सर्वसामान्य, दलित यांना न्याय मिळाला, बहुजन सक्षम झाले. मात्र, भाजपच्या जे पोटात होते, तेच त्यांच्या ओठात आले आहे. गृहमंत्र्यांचे संसदेतील वक्तव्य लाजिरवाणे आहे. आम्ही याच्चा निषेध करतो. संविधानामुळेच देशात महिलांना योग्य न्याय, सन्मान मिळत आहे. आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. संसदेत ४०० पार झाले असते, तर संविधान बदलले असते. ही भाजपची कुटनीती आम्ही खपवून घेणार नाही आम्ही रस्त्यावर उतरून लढाई करू, असेही ते म्हणाले.
कन्हैया पारकर म्हणाले, गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचे पंतप्रधान समर्थन करतात. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

