आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या संगणक कक्षातील दहा बॅटरी चोरी; सुमारे साठ हजाराचे नुकसान
▪️चोरटा स्थानिक असल्याचा सातार्डा पोलिसांचा अंदाज; संस्था उपाध्यक्ष बाळा परब
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.२३: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील संगणक कक्षेच्या पाठीमागील खिडकीतून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. कक्षातील संगणकाच्या दहा ब्याटऱ्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या चोरीमध्ये हायस्कूलचे सुमारे ६० हजारांचे नुकसान झाले असून चोरटा स्थानिक असावा असा अंदाज सातार्डा पोलिसांनी वर्तवला असल्याचे संस्था उपाध्यक्ष बाळा परब यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे नववी व दहावी वर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास देत असताना इंटरनेट मध्ये कनेक्शन मिळत नाही म्हणून लिपिक तानाजी खोत व शिपाई शेळके यांनी संगणक कक्ष उघडला असता सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याची कल्पना मुख्याध्यापक विद्याधर देसाई, संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना दिली. त्यांनी पाहिले असता संगणक कक्षाच्या खिडकीचे दोन लोखंडी गंज तुटलेले होते. सदर घटनेचे माहिती सातार्डा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व चोर स्थानिक असावा असा अंदाज व्यक्त केला. अधिक तपास सातार्डा पोलीस करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच संस्था उपाध्यक्ष बाळा परब यांनी शाळेला भेट देत पाहणी केली व चोरट्यास तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली.
_*💥कोलगावात दुमदुमणार डबलबारी भजनाचा जंगी सामना..💥*_
_🙏🏻नमस्कार! भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री देव कलेश्वर,श्री देव गजानन,श्री देवी सातेरी यांच्या कृपाशीर्वादाने..✋🏻_
_💫ओंकार संगीत विद्यालय व ओंकार प्रसादिक भजन मंडळ कोलगाव आणि ग्रामस्थ, मित्रमंडळ कोलगाव आयोजित..⚡_
*🔥२०❌२० डबलबारी भजनाचा जंगी सामना🔥*
*🌈शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी रात्रौ ठीक ८:०० वाजता 🕗*
*🌐ठिकाण : कोलगाव ग्रामपंचायत शेजारी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.*
_*🔥बुवा श्री. भालचंद्र केळुसकर🚩*_
श्री भूतनाथ प्रसादिक भजन मंडळ, वायरी, तालुका-मालवण, जिल्हा-सिंधुदुर्ग.
_*पखवाज : श्री. दादा परब*_
_*तबला : श्री. विशाल केळुसकर*_
_*❎❌❎ यांचे विरुद्ध ❎❌❎*_
_*🔥बुवा श्री. संतोष शितकर🚩*_
श्री देवी सोमजाई प्रसादिक भजन मंडळ, ठाणे-दिवा, रायगड-खरसई.
_*पखवाज : श्री. गौरव पिंगुळकर*_
_*तबला : कु. सर्वेश पांचाळ*_
_*🔥भजन रसिकांनी लाभ घ्यावा; सुप्रसिद्ध बुवा श्री. कृष्णा राऊळ यांचे आवाहन🙏🏻*_
*🩸संपर्क ⬇️*
_*📱९४२२५९६९३३*_
_*📱९५४५७९९४६३*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

