वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वैभववाडी पंचायत समितीच्या प्रशिक्षण शिबिरात अपहार होऊन चार महिने झाले तरी प्रशासनाचे दुर्लक्ष..

▪️दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न; मंगेश लोके यांचा आरोप

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी

🎴वैभववाडी,दि.२३: पंचायत समितीच्या प्रशिक्षण शिबिरात अपहार झाल्याचे स्पष्ट असतानाही जिल्हा प्रशासन दोषींवर कारवाई करीत नाही. चार महीने झाले तरी यावर ठोस निर्णय झाला नाही. या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. असा आरोप पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी केला. प्रशासनाने जरी त्यांना पाठीशी घातले तरी आम्ही कारवाई झाल्याखेरीज गप्प बसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी सभेत दिला.

पंचायत समितीची मासिक सभासभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी उपसभापती दुर्वा खानविलकर, सदस्या हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील व खाते प्रमुख उपस्थित होते.

सभेत पंचायत समितीच्या प्रशिक्षण शिबिरात झालेल्या अवास्तव खर्चाचा मुद्दा सदस्य मंगेश लोके यांनी उपस्थित केला. चार महीन्यापुर्वी हे प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून यासंबधी दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. मुख्यकार्यकारीधिकारी जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत हा आर्थिक अपहार नसून प्रशासकीय अनियमितता असल्याचा खुलासा दिला. हे कितपत योग्य आहे. पुरवठा दारांनी चौकशी दरम्यान आपण या वस्तुंचा पुरवठा केला नसल्याचे सांगितले असताना देखील याला आर्थिक अपहार म्हणायचे नाही का? असा सवाल लोके यांनी उपस्थित केला. चौकशीसाठी एवढा विलंब का लागतो असा सवाल देखील श्री. लोके यांनी उपस्थित केला. प्रशासनाने जरी त्यांना पाठीशी घातले तरीही आम्ही मात्र दोषींवर कारवाई केल्याखेरीज गप्प बसणार नाही, असा इशारा श्री. लोके यांनी दिला.

दोषींवर कारवाई होणार आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. प्रशासनावर विश्वास ठेवा. असा खुलासा गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी या विषयावर केला.

तालुक्यात २७ जानेवारी पासून ३६ शाळा सुरू होत आहेत. अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांनी दिली. तालुक्यातील बंधारे केवळ कागदोपत्री नकोत, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी करा. अशी सुचना सभापती अक्षता डाफळे यांनी दिल्या.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!