कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्याचा ठराव हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करा…

*🛑सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्याचा ठराव हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करा…*

 

*🛑अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून रोहा ते मडूरा भाग मध्य रेल्वेत सहभागी करावा व सावंतवाडी टर्मिनसला प्रा.मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे असा ठराव या हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा,अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने मुंख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात असे म्हटले आहे की,

कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या निर्मितीच्या वेळी २२% गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्याने केलेले आहे, कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्यामुळे निधी अभावी प्लाटफॉर्मला शेड नाही प्रवाशांना पावसात व उन्हात बसावे लागतेय, ब्रीज, सरकते जिने, पिण्याचे पाणी, स्पीकर, अस्वच्छ बाथरूम व रेल्वेचे दुहेरीकरण अशी अनेक महत्वाची कामे मागील २५ वर्षे रखडलेली आहेत.

सध्या कोकण रेल्वेवर ६ हजार कोटींचे कर्ज आहे, कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलीनीकरण केल्यास रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर करून ती लवकरात लवकर पूर्ण केली जातील, सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागेल तसेच येथे नवीन रेल्वे गाड्याही वाढवता येतील. कोकण रेल्वेच्या विलीनीकरणा संदर्भात गोवा, कर्नाटक व केरळ राज्यसरकार व तेथील लोकप्रतिनिधींनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, या अधिवेशनामध्ये तसा ठराव पारित करून महाराष्ट्र शासनाची २२% गुंतवणूक ही केंद्र सरकारला हस्तांतरित करावी तसेच कोकण रेल्वेचा महाराष्ट्रातील भाग रोहा ते मडूरा हा भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी आपण केंद्राकडे शिफारस करावी.

तसेच मुख्यमंत्री असताना दहा वर्षापुर्वी सावंतवाडी टर्मिनसचे काम अर्धवट राहीलेले राहीलेले त्याला निधी मंजूर करून ते पूर्ण करावे व या टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव अधिवेशनामध्ये पारित करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!