कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

कणकवली येथे २९ रोजी संस्कृत व्याकरण कार्यशाळा

*🛑कणकवली येथे २९ रोजी संस्कृत व्याकरण कार्यशाळा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १९:-* कणकवली नगर वाचनालयातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत व्याकरण कार्यशाळा रविवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या वेळेत येथील नगर वाचनालयाच्या आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात आयोजित केली आहे. पुणे येथील प्रख्यात संस्कृत शिक्षिका आरती विनय पवार कार्यशाळेत मार्गदर्शन करणार असून संस्कृत (संपूर्ण) च्या अभ्यासक्रमावर ही कार्यशाळा आधारित असणार आहे.

व्याकरण हे कोणत्याही भाषेचे मर्मस्थान असते. संस्कृत भाषेसंदर्भात व्याकरणाला विशेष महत्व आहे. विद्यार्थ्यांचा संस्कृत व्याकरणाचा पाया पक्का व्हावा व व्याकरणाचे पैकीच्या पैकी गुण कसे मिळवावेत, यासाठीच्या क्लृप्त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात हा या कार्यशाळेचा हेतू आहे. संस्कृतचा बदललेल्या स्वरुपातील पेपर नीटनेटका, वेळेचे नियोजन करून कसा लिहावा, याविषयीचे मार्गदर्शन कार्यशाळेत होणार आहे. परीक्षेसाठी उपयुक्त अशी मार्गदर्शिका कार्यशाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी आहे. गेली नऊ वर्षे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षीही कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी करणाऱ्या पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांनाच कार्यशाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी विद्यार्थी व पालकांनी ग्रंथपाल राजन कृष्णा ठाकुर (९४२११३९६८८) यांच्याशी संपर्क साधावा.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच शाळांतील संस्कृत शिक्षकांनीही कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!