सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ मार्फत आधारभूत किंमत भातखरेदीचा शुभारंभ
*🛑सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री संघ मार्फत आधारभूत किंमत भातखरेदीचा शुभारंभ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी केली तरच शासकीय योजनांचा फायदा घेता येईल. भात हमीभावाने खरेदी करताना ई पीक नोंदणी महत्त्वाची आहे. दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांची सुटका शासनाने केली आहे. त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी केले आहे.
शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२४-२५ अंतर्गत भात खरेदी शुभारंभाचा कार्यक्रम सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री. प्रमोद गावडे व व्हा.चेअरमन श्री.रघुनाथ रेडकर यांच्या शुभहस्ते संस्थेच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत मळगांव येथे करण्यात आला.
सदर भात खरेदी करीता शासनाने प्रती क्विंटल २३०० रूपये एवढा दर जाहीर केला आहे. भात खरेदी ऑनलाईन असलेमुळे, ज्या शेतक-यांचे रजिस्ट्रेशन ३१डिसेंबर २०२४ पूर्वी होणार आहे अशाच शेतक-यांनी केंद्रावर भात विक्रीस आणावयाचे आहे. भात खरेदीची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ पर्यत राहील. सावंतवाडी तालुका सह. खरेदी विक्री मार्फत सावंतवाडी, मळगांव, मळेवाड, तळवडे, कोलगांव, मडूरा, डेगवे, इन्सूली व भेडशी येथे भात खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तरी या योजनेचा सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद गावडे यांनी केले आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद गावडे व संचालक श्री. गुरुनाथ पेडणेकर यांनी शासकिय योजनेबाबत शेतक-यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. श्री . पेडणेकर म्हणाले,केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. तुमच्यासाठी सरकारने लोकप्रिय योजना राबविल्या आहेत. त्यासाठी दक्ष राहावे.
शासकीय हमीभावाने भात खरेदी शुभारंभप्रसंगी संस्थेचे संचालक श्री. अभिमन्यू लोंढे, श्री. विनायक राऊळ श्री. आत्माराम गावडे, श्री. ज्ञानेश परब, श्री. दत्ताराम कोळमेकर, श्री. प्रमोद सावंत, श्री. नारायण हिराप, श्री. शशिकांत गावडे, श्री. दत्ताराम हरमलकर, श्री. प्रविण देसाई, संस्थेचे व्यवस्थापक श्री. महेश परब, ग्रामपंचायत सदस्य श्री. सावळ, संस्थेचे कर्मचारी व पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी हेमंत राऊळ,एकनाथ मुळीक,सुनील नाईक, मारुती गावडे,महेश नाईक,अनिल मयेकर, नंदा सावळ,एकनाथ लातये, जनार्दन सावळ,कृष्णा राऊळ,तुकाराम कोरगावकर, रघुनाथ नाईक, सुभाष कुडव, औदुंबर सावंत, धर्माजी गावडे, प्रमिला राऊळ, मंजिरी सावंत आदी उपस्थित होते.
मळगांव येथे सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शासकीय हमीभावाने भात खरेदी शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष प्रमोद गावडे, उपाध्यक्ष रघुनाथ रेडकर, गुरूनाथ पेडणेकर, विनायक राऊळ, ज्ञानेश परब आदी.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

