सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करा !
*🛑सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करा !*
*🛑प्रवासी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन, २०१५ मध्ये झाले होते भूमिपूजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* २०१४ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या युती सरकारचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ जून २०१५ रोजी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते मात्र, गेल्या नऊ वर्षात टर्मिनस कामाची साधी विटही रचली गेली नाही केवळ भूमिपूजन करणाऱ्यांच्या नावांची कोनशीला अद्यापही उभी आहे सुदैवाने देवेद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत जिल्हावासीयांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नऊ वर्षापूर्वी प्रारंभ केलेले हे काम आता पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २७ जून २०१५ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले या कोनशिलेला येत्या जून महिन्यात दहा वर्षे पूर्ण होतील भूमिपूजनानंतरही सुमारे चार वर्षे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते मात्र, दुर्दैवाने त्या चार वर्षात रेल्वे टर्मिनस काम सुरुच झाले नाही सन २०१९ मध्ये राज्यात मविआ सरकार सत्तेवर आल्याने देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले त्यानंतर सुमारे अडीच वर्षानी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आता २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस भूमिपूजन विषयाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. भूमिपूजनानंतर सुरुच न झालेले हे काम मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या टर्ममध्ये पूर्ण करणार का, असा सवाल रेल्वे प्रवासी व तालुकावासीयांमधून व्यक्त होत होत आहे. गेली नऊ वर्षे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमिपूजनाची कोनशीला धूळखात उभी आहे. प्रत्यक्ष कामच सुरू न झाल्याने राज्य शासनाकडून सिंधुदुर्गवासीयांची फसवणूक झाल्याची भावना जनतेत आहे आता नऊ वर्षानी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने सावंतवाडीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या त्या कार्यकाळात रखडलेले हे टर्मिनस फडणवीस यांनी आपल्या या टर्ममध्ये पूर्णत्वास न्यावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_