दोडामार्ग तालुक्यात न्यायासाठी प्रजासत्ताकदिनी उपोषणांचा भडिमार..
▪️राजकीय, शासकीय, सामाजिक कार्यकर्त्यांची एकूण सात ते अकरा उपोषणे होणार तहसील कार्यक्षेत्रात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : दोडामार्ग
🎴दोडामार्ग,दि.२२: तालुक्यात येत्या २६ जानेवारी, प्रजासत्ताकदिनी उपोषणांचा भडिमार होत असून शासनाविरुद्ध असंतोष पहावयास मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार एकूण सात ते अकरा उपोषणे दोडामार्ग तहसील कार्यक्षेत्रात होणार असल्याची माहिती मिळत आहे. दोडामार्ग तालुक्यातील एकूण विकासाची गती तसेच अनेक समस्या याविरुद्ध ही उपोषणे असल्याचे उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनातुन दिसून येत आहे.
महादेव भिकाजी देसाई (उपसरपंच केर) यांचे उपोषण
शिरवल निडलवाडी केर भेकुर्ली हा रस्ता गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहे संबंधित यंत्रणा व ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे हा रस्ता अजूनही दुरुस्त होताना दिसत नाही आहे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी केर गावचे उपसरपंच महादेव भिकाजी देसाई यांनी शासनाला निवेदन देऊन रस्ता पूर्णत्वास न्यावा असे सांगितले होते मात्र याला शासनाने केराची टोपली दाखवली होती त्यामुळे सदरच्या रस्ता दुरुस्तीसाठी महादेव भिकाजी देसाई यांचे प्रजासत्ताक दिनी उपोषण होणार आहे.
संतोष विश्राम मावळणकर (नगरसेवक दोडामार्ग)
दोडामार्ग नगरपंचायत ही स्थापनेपासून विविध वादात अडकलेली आहे, तत्कालीन नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर सत्ताधारी यांच्यावरही आरोप-प्रत्यारोप झाले होते.सुरवातीच्या काळात भाजपा,शिवसेना व तत्कालीन स्वाभिमान यांचे नगरसेवक असल्यामुळे या ठिकाणी ही विविध प्रश्नांवर गरमागरम चर्चा व्हायची, मात्र आता संतोष म्हावळणकर यांनी नगर पंचायत क्षेत्रातील सर्वे नंबर २०५ व हिस्सा क्रमांक ०१ अ मध्ये झालेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई झाली नसल्याने उपोषणाचा मार्ग पत्करण्याचे ठरवले असून तेही उपोषण करणार आहेत.
रामचंद्र ठाकूर (नगरसेवक दोडामार्ग)
नगरपंचायत स्थापने पासून सत्तेत असलेले मनसेचे एकमेव नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनीही वारंवार तक्रार करून दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर इमारत क्रमांक १०२८ वर कोणतीही कारवाई होत नसल्याचा ठपका ठेवत उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत.
सुरेश वासुदेव बांदेकर (समाजिक कार्यकर्ते)
चर्मकार व ठाकर समाज यांच्या संयुक्त स्मशानभुमी दुरुस्तीचा विषय तसेच बांदेकर वाडीतील सार्वजनिक विहीर बांधकामात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याने २६ जानेवारी रोजी भारतीय चर्मकार समाज तालुका दोडामार्गचे अध्यक्ष सुरेश वासुदेव बांदेकर यांनी गटविकास अधिकारी दोडामार्ग यांना निवेदन दिले असून उपोषणाचा इशारा दिला आहे या सर्व गैरव्यवहारात ग्रामसेवक जबाबदार असल्यामुळे एक तर त्यांना कार्यमुक्त करावे किंवा त्यांच्यावर ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच सुरेश वासुदेव बांदेकर यांनी कोनाळ बांदेकरवाडी येथील वीज वितरण कंपनीचा नवीन बसलेला ट्रांसफार्मर त्वरित हटवावा या मागणीसाठी उपोषणाचा अर्ज महा विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्याला दिला आहे,
या ट्रान्सफार्मर शेजारी चर्मकार वस्तीतीतल समाज मंदिर असून सार्वजनिक कार्यक्रमावेळी गर्दीत याठिकाणी वाईट प्रसंगास तोंड द्यावे लागू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.
फ्रान्सिस जुवावा लोबो (शेतकरी)
तेरवण मेढे येथिल उन्नई बंधारा उजवा तीर कालवा सर्वे क्रमांक दोन ७९७ हा दिनांक ३० डिसेंबर रोजी फुटून झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाईअद्यापपर्यंत न मिळाल्याने २६ जानेवारी रोजी फ्रान्सिस जुवावा लोबो हेही उपोषणास बसणार असून ते तिलारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे संबंधित विभागाला कळविले आहे.
दिपक शिवराम जाधव व ग्रामस्थ
झरेबांबर हरिजन वाडी मधील मंजूर स्मशानभुमी व संरक्षक भिंत बांधकामास विलंब होत आहे हा विलंब का व कोणत्या कारणासाठी होतो आहे याबाबत ग्रामपंचायत अधिकृत रित्या अजूनही कळवत नाही व हे काम पूर्णत्वास नेत नाहीत यासाठी तेथील ग्रामस्थ दिपक शिवराम जाधव व इतरांनी उपोषणाचा मार्ग पत्करला असून ते सुद्धा २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून न्याय मागणार आहेत.
संदेश वागो वरक (सामाजिक कार्यकर्ते)
गेली अनेक वर्षे मागणी असलेला पाळये तेरवण मेढे ते सोनावल रस्ता अजूनही दुरुस्त करण्यात आलेला नाही वारंवार मागणी करूनही संबंधित विभाग त्याला केराची टोपली दाखवतो आहे याच मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून सामाजिक कार्यकर्ते संतोष वागो वरक हे उपोषण करणार आहेत त्यांनी लेखी पत्र दिले असून यावर ती कोणती कारवाई होते हेही येणारा काळच सांगणार आहे.
एकूण पाहता दोडामार्ग तालुका जसजशा विस्तारत चालला आहे, तसतसा समस्यांच्या गर्तेत सापडताना दिसत आहे. तर तालुक्याच्या ठिकाणी अनेक उपोषणे प्रजासत्ताकदिनी केली जाणार आहेत. यावेळी प्रशासन योग्य ताळमेळ घालून यावरती कोणती उपाययोजना करते व या उपोषण कर्त्यांना कोणता न्याय देते यावर तालुकावासीय लक्ष ठेवून आहेत.
_*💥कोलगावात दुमदुमणार डबलबारी भजनाचा जंगी सामना..💥*_
_🙏🏻नमस्कार! भजन रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री देव कलेश्वर,श्री देव गजानन,श्री देवी सातेरी यांच्या कृपाशीर्वादाने..✋🏻_
_💫ओंकार संगीत विद्यालय व ओंकार प्रसादिक भजन मंडळ कोलगाव आणि ग्रामस्थ, मित्रमंडळ कोलगाव आयोजित..⚡_
*🔥२०❌२० डबलबारी भजनाचा जंगी सामना🔥*
*🌈शनिवार दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी रात्रौ ठीक ८:०० वाजता 🕗*
*🌐ठिकाण : कोलगाव ग्रामपंचायत शेजारी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.*
_*🔥बुवा श्री. भालचंद्र केळुसकर🚩*_
श्री भूतनाथ प्रसादिक भजन मंडळ, वायरी, तालुका-मालवण, जिल्हा-सिंधुदुर्ग.
_*पखवाज : श्री. दादा परब*_
_*तबला : श्री. विशाल केळुसकर*_
_*❎❌❎ यांचे विरुद्ध ❎❌❎*_
_*🔥बुवा श्री. संतोष शितकर🚩*_
श्री देवी सोमजाई प्रसादिक भजन मंडळ, ठाणे-दिवा, रायगड-खरसई.
_*पखवाज : श्री. गौरव पिंगुळकर*_
_*तबला : कु. सर्वेश पांचाळ*_
_*🔥भजन रसिकांनी लाभ घ्यावा; सुप्रसिद्ध बुवा श्री. कृष्णा राऊळ यांचे आवाहन🙏🏻*_
*🩸संपर्क ⬇️*
_*📱९४२२५९६९३३*_
_*📱९५४५७९९४६३*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
