कणकवली कॉलेजच्या सन १९९५-९६ मधील टी.वाय.बी.कॉम. बॅचच्या मित्रमैत्रणीचे गेटटूगेदर ठरले यादगार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२२: मैत्रीला वयाची किंवा जातीभेदाची तसेच स्त्री पुरुष अशी कोणतीच सीमा नसते.जिथे विचार आणि मनं जुळली जातात तिथेच मैत्रीचे बंध गुंफले जातात आणि विश्वासाच्या नात्याने ती मैत्री अधिक दूढ होऊन बहरते.सर्व नात्या पलिकडे मैत्रीचे अनोखे नाते असते. परंतु मैत्रीचे हे रेशीम बंध किती अतुट असू शकतात याची प्रचिती १७ जानेवारी २०२१ रोजी रुपाली रिसॉर्ट पिसेकामते येथील निसर्गाच्या सानिध्यात संपन्न झालेल्या कणकवली कॉलेजच्या सन १९९५-९६ मधील टी.वाय.बी.कॉम. बॅचच्या तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्रीत आलेल्या मित्रमैत्रणीच्या पहिल्या स्नेह संमेलनात दिसून आली.संपूर्ण दिवसभर चाललेले हे स्नेह संमेलन यादगार ठरले.
कणकवली काँलेजातील १९९५-९६ मधील टी.वाय.बी.कॉम.बॅचचे पहिलेच स्नेहसंमेलन ठेवण्यात आले होते. पंचवीस वर्षापूर्वीची मित्रमंडळी नोकरी व्यवसाय व प्रपंचात कुठे असतील याचा कोणताच थांगपत्ता नव्हता.मात्र वाँटसअप ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचा शोध घेऊन सगळे एकत्रीत आले होते.अगदी पुण्यामुंबई पासूनच्या मित्रमैत्रीणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.सर्वांसाठी हा अनोखा आणि आनंदायी सोहळा होता.
या सोहळ्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता.मैत्रीची जादू म्हणा की… मैत्रीची ओढ ती अशी अद्भुत शक्ती आहे की निव्वळ मैत्री खातर सर्वांना खेचून आणत असते.तसेच काहीसे या बँचच्या गेटटूगेदरचे झाले.थोडक्या दिवसांच्या नीटनेटक्या नियोजनातून हा अविस्मरणीय आनंद सोहळा संपन्न झाला.
प्रत्यक्ष सोहळ्याच्या सुरुवातीला अजय वाळके यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात केली.त्यानंतर या बँचमधील दिवंगत मित्र अंगराज लाड,केदार कोदे व महेश मोरये यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहून त्यांचे स्मरण केले गेले.त्यानंतर उपस्थित प्रत्येकाने आपल्या व्यक्तीगत परिचयाची ओळख करून दिली.कार्यक्रमात बहार आणली ती सरिता काणेकर, विजयश्री सावंत,महेंद्र सांब्रेकर,जयराम डामरे,शंकर गोसावी आणि इतर मित्रांच्या सदाबहार गाण्यांच्या मैफिलीने. तसेच जयराम डामरे यांनी सुंदर सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली आणि आपल्या मिश्किल निवेदनाने सगळ्यांची मने जिंकली. त्याचबरोबर गीता पाटकर हिची मिमिक्री सर्वांचे निखळ मनोरंजन करून गेली.तसेच अजय वाळके,महेंद्र कदम यांच्या कविता सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणाऱ्या तसेच मनोरंजकही होत्या.महिला वर्गाचे हळदी कुंकु समारंभ व तिळगुळ वाटप,संगीत खुर्चीचा खेळ अतिशय उत्तमरित्या पार पडला.
तसेच रुपाली रिसॉर्टचे मालक श्री देसाई काका यांनीही आपल्या सुमधुर स्वरात गीत गाऊन उत्तम साथ दिली. त्यानंतर दुपारच्या अस्सल मालवणी पाहुणचार कोंबडी वडे,मासे आणि शाखाहारी भोजन व्यवस्था केली होती.
सरते शेवटी अंतक्षरीचा खेळात मराठी हिंदी गाण्यांची सुरेल मैफिल चांगलीच रंगली होती.संपूर्ण दिवसभर चाललेल्या या आनंद सोहळ्याच्या शेवटी सायंकाळी पाच वाजता महेंद्र सांबरेकर यांनी प्रत्येक उपस्थित सर्व सहकाऱ्यांना गेटटूगेदरची आठवण म्हणून कार्यक्रमातील ग्रुप फोटोची फ्रेम सरप्राईज गिफ्ट म्हणून दिली.संजय खानविलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.शेवटी पुन्हा एकत्रित येण्याचे निश्चित करण्यात येऊन तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात सर्वांनी सहभागी होण्याचा आणि मैत्री अखेर पर्यंत जपण्याचा संकल्प करून सर्वांनी एकमेकांना पुन्हा भेटण्याचा निरोप दिला.
हा आनंद सोहळा यशस्वीरित्या संपन्न होण्यामागचे खरे सुत्रधार प्रथम गेटटूगेदरची संकल्पना मांडणारे अजित लाड आणि समीता मुंज यांच्या संकल्पनेला यशस्वी साथ दिली ते महेंद्र सांब्रेकर,महेश मर्गज व विजयश्री सावंत व अन्य सहकाऱ्यांनी अथक परिश्रम आणि नेटके नियोजन करून गेटटूगेदर पूर्णत्वास नेले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

