आरोग्यकोकणरत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

कोकण पदवीधर मतदारसंघात लवकरच मोफत श्रवणयंत्रे वाटप शिबिर; आ.निरंजन डावखरे यांची माहिती

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२२: कोकण पदवीधर मतदारसंघातील गरजू कर्णबधीरांना लवकरच मोफत दर्जेदार श्रवणयंत्रे देण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी गुरुवारी येथे दिली.

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची समन्वय प्रतिष्ठान, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था मुंबई यांच्या वतीने ठाण्यातील जवेरी ठाणेवाला स्कूल फॉर डेफ शाळेमध्ये कर्णबधीरांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याच्या समारोप कार्यक्रमात आमदार डावखरे बोलत होते. यावेळी आमदार संजय केळकर यांचीही उपस्थिती होती. वाटप करण्यात येणारे यंत्र डिजिटल स्वरूपाचे असून, ते स्टार की कंपनीने तयार केले आहे. ठाण्यात झालेल्या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या माध्यमातून गरजू कर्णबधीरांना दर्जेदार यंत्रे देता आली, याबद्दल समाधानी आहोत. कोकणातही कर्णबधीरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांनाही दर्जेदार यंत्रे देण्यासाठी लवकरच शिबिरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

या उपक्रमाचे आमदार संजय केळकर यांनी कौतूक केले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील कर्णबधीरांसाठी घेण्यात आलेल्या शिबिराला अनेक कर्णबधीर विद्यार्थी व पालकांनी उपस्थिती दर्शविली होती. मात्र, वेळेअभावी सर्वांची चाचणी करता आली नाही. त्यामुळे ठाण्यात पुढील महिन्यात आणखी एक शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात पहिल्या दिवशी ६० व दुसऱ्या दिवशी ७० गरजू कर्णबधीरांना यंत्रे वाटप करण्यात आली.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!