आणखीकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

‘रंगबहार’च्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर..

▪️शुभम पाटील प्रथम; ३० जानेवारीला कुडाळमध्ये बक्षीस समारंभ

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२२: रंगबहार कुडाळ या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या  कै. मंदार रमण कुलकर्णी स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निबंध स्पर्धेत व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, तालुका सावंतवाडीचा विद्यार्थी शुभम अजित पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. येत्या ३० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

‘मी आणि माझे / माझा बाबा’ या एक जिव्हाळ्याच्या विषयावर कुडाळच्या रंगबहार संस्थेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आठवी ते पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या स्पर्धेला गोवा आणि महाराष्ट्रातून फार चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विहित मुदतीत १४८ स्पर्धक  सहभागी झाले होते. मान्यवर परीक्षकांनी या निबंधांचे परीक्षण करून निकाल जाहीर केला.

या निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक – शुभम अजित पाटील,  व्ही.पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, तालुका सावंतवाडी, द्वितीय क्रमांक (विभागून) – हर्षदा अनंत कुडव, व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज, कुडाळ आणि उषा वीरेंद्र पवार, शिवाजी विद्यालय, हिर्लोक,ता. कुडाळ, तृतीय क्रमांक – सुजय सत्यवान जाधव, कणकवली कॉलेज, कणकवली, उतेजनार्थ – साक्षी निवृत्ती गुरव, पुष्पसेन सावंत उच्च माध्यमिक विद्यालय, हुमरमळा, ता. कुडाळ, सुविता अशोक नेरुरकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र कुडाळ, योगिनी विनायक जाधव, पुष्पसेन सावंत उच्च माध्यमिक विद्यालय, हुमरमळा, ता. कुडाळ. यातील पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे रोख रु. ३००१/-, २००१/- आणि १००१/-, रंगबहार चषक आणि प्रमाणपत्र, तसेच उत्तेजनार्थ तीन क्रमांकाना रंगबहार चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचा बक्षिस  वितरण समारंभ ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठा समाज सभागृह (वातानुकूलित), कुडाळ येथे सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून होणार आहे. सर्व स्पर्धकांनी या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन रंगबहार संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!