रत्नागिरीराजकीयशासकीय

पंतप्रधान सहायता निधीकडून २७९ व्हेंटिलेटर; कोकणाची मुख्यमंत्री निधीकडून उपेक्षा कायम!

▪️आमदार निरंजन डावखरे यांनी कोरोना आपत्तीतील दुर्लक्षाकडे वेधले लक्ष..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴रत्नागिरी,दि.१८: कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधीकडून कोकणातील पाच जिल्हा रुग्णालयांना २७९ व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री निधीकडून रुग्णालयांना काहीही मदत देण्यात आली नाही. केवळ रत्नागिरी येथील कोरोना आरटीपीसीआर लॅबसाठी दिलेले १ कोटी ७ लाख रुपये वगळता मुख्यमंत्री निधीकडून कोकणाला ठेंगा दाखवून उपेक्षा करण्यात आली, याकडे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.

कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीकडून कोकणातील पाच जिल्ह्यात कोणती मदत व साहित्य पुरविण्यात आले, याबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती मागविली होती. त्यानुसार कोकणातील पाच जिल्ह्यात पंतप्रधान सहायता निधीतून २७९ व्हेंटिलेटर, २६५ जम्बो सिलिंडर आणि ३७१ थ्री टाईप सिलिंडर पुरविण्यात आले. तर मुख्यमंत्री सहायता निधीकडून रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना चाचणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी १ कोटी ७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला, अशी माहिती संबंधित शल्यचिकित्सकांकडून पत्राद्वारे देण्यात आली आहे.
पंतप्रधान सहायता निधीतून ठाणे जिल्हा शासकिय रुग्णालयाला ४६, पालघरमध्ये ४४, रत्नागिरीत ४४, सिंधुदुर्गात ४७ आणि रायगडमध्ये ९८ व्हेंटिलेंटर पुरविण्यात आले. रायगड जिल्हा शासकिय रुग्णालयाला व्हेंटिलेटरबरोबरच २६५ जम्बो सिलिंडर व ३७१ थ्री टाईप सिलिंडर पुरविण्यात आले. तर मुख्यमंत्री सहायता निधीतून केवळ रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना चाचणी लॅबसाठी निधी दिला गेला. उर्वरित जिल्हा रुग्णालयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक रुपयाही मिळालेला नाही, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले आहे.

ठाणे जिल्ह्यासह कोकणातील जिल्हा रुग्णालयांकडे राज्य सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. किमान कोरोना आपत्तीत जिल्हा रुग्णालयांना भरीव मदतीची अपेक्षा होती. मुख्यमंत्री सहायता निधीत कोट्यवधी रुपयांचा निधी जमा झाला असतानाही कोकणाची उपेक्षा करण्यात आली. महाविकास आघाडीकडून कोकणाकडे सातत्याने दुर्लक्ष जात असून, आताही कोकणाला ठेंगा दाखविण्यात आला, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

पंतप्रधान सहायता निधीला दिलेली मदत सार्थकी; निरंजन डावखरे
कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान सहायता निधीऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देण्याचा आग्रह दिला जात होता. मात्र, भाजपाचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य जनतेने पंतप्रधान सहायता निधीला दिलेली मदत सार्थकी लागली, अशी प्रतिक्रिया आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.

*_💥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..🔥धमाका ऑफर..💥_*

*🔥SALE!!!🔥SALE!!!🔥SALE!!!🔥*

*_🪔दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ब्रँडेड कपडे खरेदी करा आणि मिळवा ५०% ची सूट_💰*

_🏃🏻‍♂️👖👕वाट कसली बघताय? आज भेट द्या सयानी ड्रेसेस ह्या कपड्याच्या दालनाला! आणि मिळवा आपल्या आवडत्या कपड्यांवर ५०% ची सूट_💰🏃🏻‍♀️

*🏩आमचा पत्ता*
*सयानी ड्रेसेस*
उभाबाजार, चितारआळी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग
*_📱संपर्क : 9423818666_*

*🔮ऑफर काही मर्यादित दिवसांसाठीच..*
*🔮अटी व शर्ती लागू..*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!