नागावे गावाने सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध केली हे आदर्शवत; रमेश कदम

▪️नवनिर्वाचित सरपंच प्रकाश चिपळूणकर यांच्यासह सदस्यांचा सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.१३: गाव विकास आणि प्रशासकीय कामांचा दीर्घकाळ अनुभव असलेली व्यक्ती एकूण गावाने बिनविरोध निवडणूक घडवून सरपंचपदी निवड करावी ही आदर्शवत बाब आहे, नूतन सरपंचांनी प्रत्येक कुटूंबाच्या अडचणीत आधार द्यावा अशी भावना माजी आमदार रमेश कदम यांनी नागावे येथे नवनिर्वाचित सरपंच प्रकाश चिपळूणकर व सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात व्यक्त केली. नागावे ग्रामपंचायतीच्या २०  वर्ष सदस्य राहिलेल्या  प्रकाश चिपळूणकर यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी सुरेश साळवी यांची बिनविरोध निवड  करण्यात आली.  यानंतर चिपळूणकर परिवारातर्फे नुकताच सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागावे नवनिर्वाचित सरपंच प्रकाश चिपळूणकर, उपसरपंच सुरेश साळवी यांच्यासह सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच प्रकाश चिपळूणकर यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, गावासह सदस्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो सार्थकी ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील, यात शंका नाही. याकरिता सर्वाना विश्वासात घेतले जाईल आणि सदस्यपदाचा २० वर्षांचा अनुभव नक्कीच कामी येईल, असे स्पष्ट केले. यावेळी सीबीआय वरीष्ठ अधिकारी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व मोहाने गावचे सुपुत्र अरविंद मोरे, अलोरे येथील रहिवासी कमांडर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव, कॅप्टन वसंत मोरे,  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दादा साळवी, जिल्हा परिषद सदस्य व माजी जि. प. बांधकाम, आरोग्य समिती सभापती विनोद झगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, डॉ. रणजित पाटील,  राष्ट्रीय रविदास परिषद अध्यक्ष शांताराम कदम, माजी सरपंच चंद्रकांत पालांडे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे, सेवानिवृत्त डेप्युटी कलेक्टर एस. एम.  पालशेतकर,  डॉ. रणजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष  जागृती शिंदे, जयंत शिंदे, अलोरे माजी सरपंच पभाऊ मोहिते,  सेना माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, कोळकेवाडी माजी सरपंच प्रकाश कदम, वसुधा पाकटे, ज्येष्ठ ग्रामस्थ भाऊ शिरकर, शमशुद्दीन चिपळूणकर, दिलीप शिंदे, शरद शिंदे, प्रकाश आंब्रे,  गजानन चव्हाण, वसंत चव्हाण, ग्रामसेवक सुभाष कदम, पाथर्डी माजी सरपंच लक्ष्मीकांत देवरुखकर आदींनी उपस्थिती दर्शवत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच याचबरोबर सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सरपंच प्रकाश चिपळूणकर, उपसरपंच सुरेश साळवी, नवनिर्वाचित सदस्य प्रकाश पालांडे, सुशांत साळवी, सौ. नलिनी पालांडे, सौ.  दर्शना निगडे,  सौ. प्रतिभा चव्हाण  सौ. त्रिवेणी खुर्देकर, सौ, सुमन शिंदे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन दिनकर पीरदनकर  गुरुजी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिपळूणकर परिवार व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_

               *🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)

                 *मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)

_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_

*🤷🏻‍♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.

                 *🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)

             *💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)

            *💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!