वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे ८ रोजी चित्रकला स्पर्धा
*🛑वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे ८ रोजी चित्रकला स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- ०६:-* : येथील नगर वाचनालयातर्फे रविवार, ८ डिसेबर रोजी पद्माकर सखाराम सौदागर स्मृती अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत वेंगुर्ले तालुका मर्यादित चित्रकला स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सकाळी ९ ते ११ यावेळेत होणार असून इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. पाचवी ते सातवीच्या मुलांनी ‘फुगेवाला व फुगे विकत घेणारी मुले, कबड्डी खेळणारी मुले, पावसाचा आनंद घेणारी मुले आणि घरात वाचनात मग्न असणारी भावंडे’ यापैकी एका विषयावर चित्र काढायचे आहे. चित्रात किमान तीन व्यक्तिरेखा असणे आवश्यक आहे. यातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ११००, ९००, ७०० आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांची दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. दुपारी ३.३० ते ५.३० यावेळेत आठवी ते दहावी गटाची स्पर्धा होणार आहे. या गटाच्या स्पर्धकांसाठी ‘दुकानात पुस्तके विकत घेणारे कुटुंब व दुकानदार, शाळेच्या कट्ट्यावर वाचनात मग्न असणारी मुले, गणपतीची आरती करणारे कुटुंब आणि घराच्या अंगणात खेळणारी मुले’ यापैकी एका विषयावर चित्र काढायचे आहे. चित्रात किमान चार व्यक्तिरेखा असणे आवश्यक आहे. यातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५००, ११००, ९०० आणि उत्तेजनार्थ ७५० रुपयांची दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. दोन्ही गटातील स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी शाळेमार्फत, पालकांनी किंवा स्वतः कार्यालयीन वेळेते ६ डिसेंबरपर्यंत करावी. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी ८२७५६६७०९० येथे संपर्क साधावा,असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

