मालवण केंद्रावर ९ पासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी
*🛑मालवण केंद्रावर ९ पासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी*
*🛑चार नाटके होणार सादर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२६:-* महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२४-२५ ची प्राथमिक फेरी ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत मालवण केंद्रात मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात होत आहे. सिंधुदुर्गातील नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गतवर्षी नऊ नाटके सादर झाली होती. यावेळी फक्त चारच नाटके सादर होणार आहेत.
सोमवार ९ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता ‘द कॉन्शन्स’ (बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक अमेय दक्षिणदास, दिग्दर्शक केदार सामंत आहेत. बुधवार ११ रोजी सायंकाळी ७ वाजता “ओएँ
सिस’ (अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक इरफान मुजावर, दिग्दर्शक हेमंत कदम आहेत. गुरुवार १२ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता ‘मुक्काम पोस्ट भोकरवाडी’ (क.म.शि.प्र. मंडळाची आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक केदार सामंत, दिग्दर्शक शमा वैद्य आहेत. शुक्रवार १३ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘झम्पय’ (अक्षरसिंधु साहित्य कलामंच, कणकवली) नाटक होणार आहे. या नाटकाचे लेखक विजय चव्हाण, दिग्दर्शक सुहास वरुणकर आहेत. सर्व नाट्यप्रेमींनी नाटकांचा लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभाग अपर मुख्य सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभिषण चवरे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

