युवकाला मारहाणप्रकरणी पंधराजणांवर गुन्हा दाखल
*🛑युवकाला मारहाणप्रकरणी पंधराजणांवर गुन्हा दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* मंदिराच्या परिसरात दारू का
पितोस, अशी विचारणा करत युवकाला मारहाण करत त्याचे व्हिडिओ मोबाईलवर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी सांगेली येथील दहा ते पंधरा जणांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद जखमी झालेले ओवळीये-खालचीवाडी येथील रोशन सत्यवान सावंत (२१) यांनी पोलीस ठाण्यात दिली. ही घटना २२ नोव्हेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सांगेली गिरोबा मंदिरामागील जंगलयम भागात घडली होती. रोशन सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सांगेली येथील सहदेव सनाम, सोनू रेमुळकर, विठ्ठल मेस्त्री व अन्य दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली. सावंत यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, सांगेली गिरोबा मंदिर जत्रोत्सव होता. त्या दिवशी मंदिर परिसरातील जंगलमय आवारात आपण मद्यपान करत असताना तेथील काही युवकांनी ‘तू मंदिराच्या आवारात दारू का पितोस’, असे विचारून वाद घातला. त्यानंतर आपण माफी मागितली. त्यानंतरही तेथे जमलेल्या दहा ते पंधराजणांनी आपल्याला शिवीगाळ करत हाताच्या ठोशाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यापुढे गावाच्या हद्दीत दिसता नये, अशी धमकी देत मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करून आपली बदनामी केली. या तक्रारीनुसार सांगेली येथील सहदेव सनाम, सोनू रेमुळकर, विठ्ठल मेस्त्री व अन्य दहा ते पंधरा जणांविरोधात तक्रार दाखल केली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

