दुचाकीमधून दारुची वाहतूक करताना पकडले
*🛑दुचाकीमधून दारुची वाहतूक करताना पकडले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२५:-* म्हापण ते निवती-मेढा रस्त्यावर म्हापण (सिद्धेश्वर मंदिरासमोर) येथे टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीमधून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करीत असताना प्राजक्ता प्रवीण निवतकर (३३, रा. निवती मेढा, ता. वेंगुर्ले) हिला निवती पोलिसांनी पकडले. यात ९० हजार रु. किंमतीची दुचाकी व २२ हजार ३२० रु. किंमतीची गोवा बनावटीची दारू मिळून एकूण एक लाख १२ हजार ३२० रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राजक्ता हिला ताब्यात घेत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबतची फिर्याद निवती पोलीस ठाण्याचे हवालदार पंढरीनाथ भांगरे यांनी दिली. एका दुचाकीमधून महिला दारू वाहतूक करीत असल्याची माहिती निवती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने म्हापण ते निवती मेढा रस्त्यावर म्हापण येथे २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सापळा रचला. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी म्हापण (सिद्धेश्वर मंदिरासमोर) येथे त्याच मार्गाने जाणारी ज्युपिटर दुचाकी या पथकाने थांबविली आणि तपासणी केली असता, या दुचाकीच्या डिकीमध्ये गोवा बनावटीची दारु सापडली. प्राजक्ता निवतकर ही आपल्या ताब्यातील या दुचाकीमधून दारु वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले. ८,४०० रु. किंमतीची बॉब लेमन होडका, ४,८०० रु. किंमतीची रॉयल बँड, ३,४०० रु. किंमतीची किंगफिशर स्ट्रॉग, ५,४०० रु. किंमतीची डीएसपी ब्लॅक व ३२० रु. किमतीची बॅग पायपर अशी २२ हजार ३२० रु. किंमतीची गोवा बनावटीची दारु तसेच ९० हजार रु. किंमतीची ज्युपिटर दुचाकी जप्त केली. तसेच गैरकायदा, बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करीत असताना मिळून आल्याप्रकरणी प्राजक्ता निवतकर हिच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंढरीनाथ भांगरे, सचिन सोन्सुरकर, पोलीस नाईक विक्रांत लोणे, होमगार्ड ओंकार धुरी, महिला होमगार्ड श्रीमती नांदोस्कर यांनी केली. तपास हवालदार सुनील सावंत करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
