दोन गटात मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता
*🛑दोन गटात मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२५:-* वेंगुर्ले पिराचा दर्गा येथे मोहरम कार्यक्रमावेळी दोन गटात झालेली मारहाण तसेच अनिसा इरफान शेख यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून घेऊन शिवीगाळ व मारहाण केल्याच्या आरोपातून वेंगुर्ले येथील रोहन बांदेकर, अली मुल्ला व सलीम मुल्ला यांच्यासह अन्य संशयित आरोपींची वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. वाय. रायरीकर यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड. स्वप्ना सामंत, अॅड. सुनील मालवणकर, अॅड. तेजाली भणगे व अॅड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले. या घटनेची फिर्याद अनिसा शेख (रा. वेंगुर्ले) यांनी पोलिसांत दिली होती. अनिसा शेख, तिचे पती इरफान शेख, सासरे नजीर शेख, दीर सईद शेख, नियाज शेख, अय्याज शेख यांचे व आरोपी रियाज मुल्ला यांच्यामध्ये पूर्वीपासून आपसात वाद होते. २१ सप्टेंबर २०१७ रोजी आठ वा. पिराचा दर्गा येथे मोहरमचा कार्यक्रम सुरू होता. तेथे आरोपी शहानवाज शेख याची मारुती व्हॅन होती. फिर्यादीच्या कुटुंबियांनी ती व्हॅन काढण्यास त्याला सांगितले. त्याचा राग त्याला आला. नंतर तो व अन्य आरोपी पिराचा दर्गा येथे एकत्र आले व जमाव करून तिच्या कुटुंबियास शिवीगाळ करू लागले. अनिसा शेख यांचे पती इरफान शेख यांनी वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे दूरध्वनी केला. त्यामुळे जमा झालेले सर्व आरोपी तेथून पळून गेले होते. त्याचदिवशी रात्री पावणेदहा वाजता पुन्हा सर्व आरोपी पिराचा दर्गा या ठिकाणी जमा झाले. त्यांच्या हातामध्ये बॅट, दांडा, लोखंडी रॉड असे साहित्य होते. तेव्हा आरोपी तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये जोरदार वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण केली. वेंगुर्ले न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

