लढाई प्रेमानी लढून जिकायची असते-विशाल परब.
*🛑लढाई प्रेमानी लढून जिकायची असते-विशाल परब.*
*🛑माझ्या विरोधात वाईट बोलणाऱ्यांचे देव भले करुन सुबुद्धी देवो*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* विधानसभेची लढाई मतदारांच्या प्रेमाने जिंकायचे आहे. त्यामुळे माझ्या विरोधात टीका करणाऱ्यांना आणि वाईट बोलणाऱ्यांना माझा साष्टांग नमस्कार. येणाऱ्या २३ तारखेला जनता मतपेटीतून त्यांना उत्तर देईल, असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी साटेली येथे व्यक्त केला. दरम्यान गेली पंधरा वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी येथील जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. आरोग्य, रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे काही झाले तरी आता निश्चितच बदल होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
श्री. परब यांनी काल सायंकाळी उशिरा साटेली तर्फ सातार्डा येथील मतदारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, माझ्यासोबत कोणीही स्टार प्रचारच नाही. सर्वसामान्य जनता शेतकरी हेच माझे प्रचारक आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर मी आजपर्यंत यशस्वी प्रवास केला आहे आणि आता निश्चितच विधानसभेत जाऊन या भागाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे कोण काय बोलते त्याकडे मी लक्ष देणार नाही तर माझे काम करत राहणार आहे. येथील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबत त्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे कोण टीका करतो? कोण माझ्या विरोधात बोलतो? यावर भाष्य करणार नाही. माझ्या विरोधात असलेले नेते मोठे आहेत. त्यांनी गेल्या पंधरा वर्षात काय केले याचे उत्तर सर्व मतदारांकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना निश्चितच मतभेटीच्या माध्यमातून उत्तर देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवा मांजरेकर, परशुराम मांजरेकर, प्रथमेश मांजरेकर, सचिन मांजरेकर, गोविंद कळंगुटकर, गौरेश कोरगावकर, नंदकिशोर कोरगावकर, अनिकेत मांजरेकर, उमेश कांबळी, पुनम कोरगावकर, समिक्षा मांजरेकर, प्रसाद कळंगुटकर, प्रविण कळंगुटकर, वासुदेव कळंगुटकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

