जिल्हा गिरणी कामगार संघटनेकडून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा
*🛑 जिल्हा गिरणी कामगार संघटनेकडून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि-१५:-* सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेकडून महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. गिरणी कामगारांचे प्रश्न केसरकर मार्गी लावतील असा विश्वास संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर मंत्री केसरकर यांनी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याकडे लक्ष वेधून आचारसंहितेनंतर या प्रश्नावर मुख्यमंत्री लक्ष देतील असे त्यांनी सांगितले. केसरकर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार यांनी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. गिरणी कामगारांच्या प्रश्नांची जाण केसरकर यांना असून ते आमचे प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत केसरकर यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी जिल्हाध्यक्ष शामसुंदर कुंभार, रामचंद्र कोठावळे, लॉरेंस डिसोझा, सुभाष परब, रेखा लोंढे आदींसह सिंधुदुर्ग गिरीणी कामगार सावंतवाडीचे पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी श्री केसरकर म्हणाले, पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा तिलारी बुडीत धरण क्षेत्रातील नोकऱ्या न मिळालेल्या मुलांना वन टाईम सेटलमेंट करून देत ठरावीक रक्कम दिली होती. त्यानंतर नोकरीवरचा अधिकारी त्यांनी सोडला होता. गिरणी कामगारांची मागणी देखील त्याच स्वरूपाची आहे. घर लवकर तयार होत नसतील तर ठरावीक रक्कम देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय आज जाहीर करता येणार नाही. मात्र, आचारसंहिता संपताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हा विषय मांडून न्याय दिला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शनिवारी सावंतवाडीत येत असून त्यांचे लक्षही याकडे वेधेन असे सांगत संघटनेनं जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल केसरकर यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_