पुणे येथे गौड ब्राह्मण समाजाचा आजपासून क्रीडा महोत्सव
*🛑पुणे येथे गौड ब्राह्मण समाजाचा आजपासून क्रीडा महोत्सव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०८:-* गौड ब्राह्मण सभा संकल्पित नववा क्रीडा महोत्सव २०२४चे आयोजन कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाज, पुणेतर्फे ८ ते १० नोव्हेंबर या तीन दिवसात सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विज्ञापीठ, लव्हाळे येथील संकुलात व मैदानात होणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन ९ रोजी सकाळी सात वा. होणार आहे. सर्व संघ खेळाडू व पदाधिकाऱ्यांची निवास व रात्रीची भोजन व्यवस्था ८ रोजी दुपारी १२ पासून सुरु करण्यात येणार आहे. ज्ञातीबांधवांचा सांगितीक कार्यक्रम ९ रोजी सायंकाळी ७.३० वा. नाट्यगृहात होणार आहे. बक्षीस समारंभ १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ३ वा. होणार आहे.
नवव्या क्रीडा महोत्सवाच्या सर्व सूचना, नियम, अटी व नोंदणी प्रक्रिया यांची माहिती लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. महिला व पुरुषांसाठी क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कॅरम, बॅ डमिंटन, बुद्धिबळ असे चार प्रकारचे खेळ खेळविले जातील त्याचबरोबर कला प्रदर्शन भरवले जाईल. त्यातील कोणत्याही फक्त दोन प्रकारच्या खेळात महिला व पुरुष खेळाडू सहभागी होऊ शकतील. यातील क्रिकेटचे सामने प्रकाशझोतात खेळविले जातील.
कला प्रदर्शनात सर्व हस्त, शिल्प, चित्र कलाकार सहभागी होऊ शकतात. नन्हे कुडाळदेशकरांसाठी सुद्धा क्रीडा सामने घेण्याचा मानस आहे. क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही संस्थेच्या वेबपेजवर (खेळाची माहिती, कार्यक्रम पत्रिका) रजिस्ट्रेशन लिंक लवकरच उपलब्ध होणार आहे. कुडाळदेशकर खेळाडूंनी तारीख आरक्षित ठेवणे व पूर्वनोंदणी करणे गरजेचे आहे. जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन गौड ब्राह्मण सभा व कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाज, पुणेतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
