उमेदवारांसाठी खर्चाचा हिशेब तपासण्याच्या तारखा जाहीर
*🛑उमेदवारांसाठी खर्चाचा हिशेब तपासण्याच्या तारखा जाहीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०८:-* केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचा दैनंदिन खर्चाचा हिशेब प्रचार कालावधीत किमान तीनवेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षकांकडून तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर केल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समिती समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे. या वेळापत्रकानुसार तिन्ही मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी ९ नोव्हेंबर, द्वितीय तपासणी १३ रोजी व तृतीय तपासणी १७ रोजी होणार आहे. या तिन्ही तपासण्या जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे होणार आहेत. उमेदवारांना खर्च मर्यादा ४० लाख असून या तपासणीत उमेदवारांकडून आयोगाने आखून दिलेल्या विहित नियमानुसार व मर्यादेत खर्च करीत आहेत किंवा कसे? याची खातरजमा निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खर्च सनियंत्रण समितीकडून केली जाणार आहे. उमेदवार, उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी यांनी विहित वेळेत अभिलेख निवडणूक खर्च निरीक्षक यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन न दिल्यास लोकप्रतिनिधित्व कलमान्वये उमेदवाराने खर्चाचे दैनंदिन अभिलेख अद्यावत ठेवले नसल्याचे समजण्यात येऊन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावल्या जातील. मर्यादेपेक्षा जास्त खर्च करेल त्याला अपात्र करण्याबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

