फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची गरज !
*🛑फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची गरज !*
*🛑वेंगुर्त्यातील कार्यक्रमात प्रा. डॉ. सुनील भिसे यांचे प्रतिपादन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-०२:-* फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधाराच समाजातील अराजकतेला थोपवू शकेल. त्यासाठी व्यापक चळवळीची गरज आहे. आजची राजकीय व्यवस्था पाहता देश पुन्हा एकदा पारतंत्र्यांत जाण्याची दाट शक्यता आहे. आपण आज जागृत नाही झालो तर त्याचे परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील. इंटरनेट आणि मोबाईच्या जाळ्यात जनतेला गुरफटवून सत्ताधारी खुशाल देश लुटत आहेत. याला आळा बसविण्यासाठी फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचारांची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याची गरज आहे, असे विचार प्रा. डॉ. सुनील भिसे यांनी व्यक्त केले. येथील साई मंगल कार्यालयात आयोजित शाहू- फुले-आंबेडकर विचारमंचच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रा. वसंत नंदगिरीकर, महेंद्र मातोंडकर, एन. पी. मठकर, लाडू जाधव, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, विमल शिंगाडे, शिवराम आरोलकर, दाभोली हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, मठ हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील जाधव, विठ्ठल जाधव, वाय. बी. कदम, भानुदास गवंडी, राजू आंदुर्लेकर, राजकुमार शिंगाडे, अंबरिश मांजरेकर आदी उपस्थित होते. एन. पी. मठकर यांनी कायदा परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल, प्रा. वसंत नंदगिरीकर व विमल शिंगाडे यांना आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व अंबरिश मांजरेकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. विचारांचा जागर शाळा कॉलेजमधून करुया ! भावी पिढीला फुले-शाहू-आंबेडकर समजले पाहिजेत. थोर राष्ट्रपुरुषांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी विचारमंचतर्फे व्यापक कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार यावेळी बोलताना अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, या जमान्यात राष्ट्रपुरुषांचे कार्य नव्या पिढीसमोर पोहोचविणे हे खरे तर आव्हान आहे. कारण आताची पिढी ही मोबाईलच्या जाळ्यात अडकली आहे. यामुळे आपली मराठीही धोक्यात आली आहे. आताची मुले वाचनात रमताना दिसत नाहीत. परिणामी त्यांच्यात वैचारिक प्रगल्भता नाही. त्यामुळेच पसरत चालेल्या अराजकतेमुळे ही पिढी अस्वस्थ होताना दिसत नाही. आदर्श समाज निर्मितीसाठी थोरा-मोठ्यांच्या विचारांच्या जागराची नितांत गरज आहे. हा जागर शाळा, कॉलेजमधून करण्याचा निर्धार करूया, असेही ते म्हणाले. सत्कारमूर्ती प्रा. वसंत नंदगिरीकर, विमल शिंगाडे, अॅड. एन. पी. मठकर यांनी आपले जीवनातील अनुभव कथन करत जगण्यातला संघर्ष उलगडून सांगितला. फुले-शाहू- आंबेडकरसारख्या विभूतींमुळेच आज अनेक शोषितांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला, असा सूर त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक महेंद्र मातोंडकर यांनी केले, तर, आभार लाडू जाधव यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_