सिंधुदुर्गनगरीतील रस्त्यांलगत फुटपाथ बनविण्याचा कामात होतोय लाखोंचा भ्रष्टाचार..

▪️सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार संगनमताने करतायत शासनाचा लाखोंचा निधी गिळंकृत..

▪️४२ लाख रुपये खर्च करून प्राधिकरण क्षेत्रात केल्या जाणाऱ्या सुधारणा कामाचे महाराष्ट्र सैनिकांनी केले साईटवर जाऊन “पोस्टमार्टम”..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१८: नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतंर्गत सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रात सिंधुदुर्गनगरी येथील तिठा ते जिल्हा रुग्णालय बाजूच्या रस्त्यालगत पदपाथ (फुटपाथ) करणे हे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग ओरोस कार्यालयाच्या देखरेखीखाली  चालू आहे. ४२ लाख रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या या सुधारणा कामात सदोष पद्धतीचा अवलंब करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार संगनमताने लाखोंचा शासन निधी गिळंकृत करत आहेत. असे कामाच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान उघड होत आहे. वास्तविक कामाच्या अंदाज पत्रकीय तरतुदीनुसार विहित पद्धतीने सोलिंग व कोन्क्रीट पीसीसी केल्या नंतरच त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे अशी तरतूद असताना प्रत्यक्षात मात्र मातीवर पूर्णपणे ग्रीट पसरून  त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम केले जात आहे. यामुळे या कामात कंत्राटदाराचे जवळपास १२ ते १४  लाख रुपये वाचणार असून ते संगनमताने जिरवले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर असताना देखील जबाबदार अधिकाऱ्यांना कामाची सदोष पद्धती दिसत नाही. हा खरा संशोधनाचा विषय असून त्यामागे हितसंबंध गुंतल्याची शक्यता आहे. परिणामी भविष्यात या कामाचे जीवनमान किती असणार आहे व ते किती दिवस टिकणार आहे. याचा विचार नवनगर प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी व सदस्यांनी करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जमा झालेल्या शासन निधीवर अशाप्रकारे डल्ला मारला जात असताना प्राधिकरणाचे जबाबदार अधिकारी व सदस्य दुर्लक्ष करत आहेत. हे नेमके गौडबंगाल काय आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. “आंधळं दळतंय व कुत्रं पीठ खातंय” अशा पद्धतीने चाललेला मनमानी कारभार मनसे शिष्टमंडळ प्राधिकरण अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेवून चाललेला भ्रष्टाचार पुराव्यांनिशी मांडून सखोल चौकशीची मागणी करणार आहे. जनतेने देखील याबाबतीत जागरूकता दाखवून शासकीय निधीचा योग्य प्रकारे कसा वापर होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!