राजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल व गॅस च्या दरात भरमसाठ वाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध..

▪️गांधीगिरी मार्गाने साखर, तिळगुळ व तीळलाडू नागरिकांना वाटप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१८: केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस च्या दरात भरमसाठ वाढ केल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना देखील याचा फटका बसल्याने आज सोमवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने गांधी चौक व नगरपरिषद सावंतवाडी जवळील पेट्रोल पंप येथे ये-जा करणाऱ्या नागरिकांना व रिक्षा नाक्यावर साखर, तिळगुळ व तीळलाडू वाटप करून गांधीगिरी मार्गाने भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.

सध्याच्या कोविड-१९ च्या कोरोनाच्या काळात आधीच दैनंदिन जीवन मेटाकुटीला आले असताना देखील केंद्र सरकार मात्र गॅस व पेट्रोल या इंधनावरील दर वाढवत असून सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर कमी असताना ही त्याहून चार पटीने यावर कर आकारून याची विक्री केंद्र सरकार करत असून काही वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या राजवटीततील दरापेक्षा आता तीप्पटीने हे दर वाढवून नागरिकांची गळचेपी करण्यात येत आहे. अच्छे दिन सांगून जनतेचा भ्रम निरास केला आसल्याने या दरवाढीचा निषेध म्हणून आज जिल्हा काँग्रेस चे माजी अध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कार्यकात्यांनी भाजपा सरकारचा साखर, तिळगुळ वाटून गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या सौ. विभावरी सुखी यांच्या नेतृत्वाखाली निषेध केला.

यावेळी जिल्हा चिटणीस बाळू अंधारी, मालवण-कुडाळ विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र म्हापसेकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, माया चिटणीस, युवक विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी, संदीप सुखी, चंदन पांगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नुतन सावंत, गीता सावंत. पेरपेदीन, सरदार ताजर, विधानसभा मिडीया प्रमूख जासमीन लकमेक्षवर, फिझा मकानदार, उमेश सावंत, बाळा नमशी, सुधीर मल्हार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!