सत्य आणि तथ्य सांगणारा उमेदवार जनतेने निवडून दिल्यामुळे स्वागत नाटेकर यांनी मानले मतदारांचे आभार
इन्सुलीत ११ जागांपैकी भाजप शिवसेना ५-५,अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांनी सिद्ध केली आपली पात्रता
सत्य आणि तथ्य सांगणारा उमेदवार जनतेने निवडून दिल्यामुळे स्वागत नाटेकर यांनी मानले जनतेचे आभार
ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशा तत्वावर चालणारा उमेदवार निवडून आल्यामुळे इन्सुलीतील जनता खुश
इन्सुलीत ११ जागांमध्ये ५ भाजप,५ शिवसेना आणि एक अपक्ष, त्यामुळे समांतर ठरलेल्या इन्सुलीमध्ये अपक्ष विजयी उमेदवाराचा कोण हाथ धरतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, अपक्ष उमेदवार श्री.स्वागत नाटेकर हे भाजप पक्षाने नाकारल्यानंतर नाराज असल्याचे दिसून आले होते त्यानंतर त्यांनी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी अपक्ष फॉर्म भरला होता, जनतेने त्यांना स्वीकारले आणि आज ते निवडून आले.त्यामुळे भाजपचे लक्ष आता श्री नाटेकर यांच्याकडे असणार आहे.स्वागत नाटेकर हे भाजपचे कट्टर समर्थक कार्यकर्ते आहेत.सत्य आणि तथ्य सांगणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे,ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशा मा.पंतप्रधान मोदी साहेबांच्या तत्वावर चालणे हा त्यांचा स्वभाव आहे , त्यामुळे इन्सुली गाव आता भ्रष्टाचार मुक्त होईल यात शंकाच नाही.स्वागत नाटेकर यांचे इन्सुली गावाबरोबरच संपूर्ण पंचक्रोशीत चाहते आहेत त्यामुळे सरपंच पदासाठी ओपन मधुन जागा निश्चित झाल्यास स्वागत नाटेकर यांना सरपंच पद देण्यात यावे अशी पंचक्रोशीत चर्चा आहे.सत्य आणि तथ्य सांगणारा कार्यकर्ता निवडून दिल्यामुळे स्वागत नाटेकर यांनी मानले जनतेचे आभार

