विकास कुडाळकर व संजय पडते पिंगुळी मतदार संघात भाजपाचे अस्तित्व नष्ट करत असल्याने उमेश धुरी सैरभैर..
▪️विकास कुडाळकर यांच्या अस्तित्वाची काळजी न करण्याचा उमेश धुरींना शिवसेनेचे भरत परब व प्रसाद प्रभू यांचा सल्ला..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०९: शिवसेना नेते विकास कुडाळकर यांच्या अस्तित्वाची काळजी उमेश धुरी यांनी करू नये त्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. धुरी यांनी आपल्या अस्तित्वाची काळजी करावी, असा सल्ला पिंगुळीचे शिवसेना ग्रामपंचायत सदस्य भरत परब तसेच प्रसाद प्रभू यांनी दिला.
आज विकास कुडाळकर यांनी सत्य बाहेर काढल्यावर उमेश धुरी यांना का झोंबले? ते विकास कुडाळकर यांना धुतले अशी भाषा वापरून वास्तव बाहेर काढू असे सांगितले. राजकीय रोजंदारांची भाषा तुम्ही कराल तर तुम्ही राजकारणात काय करत आहात ते पण उघड करा. नेत्यांना खुश करण्यासाठी कोणी उगाच काहीतरी पगारी नोकरांकडून लिहून घेऊन आपले असलेले अस्तित्व कमी का करता? तुमचे जनतेला फसवण्याचे धंदे पण माहिती आहेत. स्वस्त दाराचे दुकान कसे चालवता आहेत.
‘विकास’ हे नाव तुम्हाला वारंवार घ्यावे लागते. कारण तुम्हाला आमचे नेते मुख्यमंत्री पदावरती बसले तेव्हापासून तुम्हाला व तुमच्या कार्यकर्त्यांना पोटशूळ उठला आहे. त्यामुळे तुमचे नेते शिवसेना हद्दपार करण्याची फालतू स्टेटमेंट देऊन स्वतःला प्रसिद्धी करण्याची धडपड करत आहेत.
शिवसेना संपण्याची भाषा करणारे स्वतःच संपले आहेत. विकास कुडाळकर यांच्यावर नाहक आरोप करण्यापेक्षा वेंगुर्लेमध्ये सभेला जाण्याचे धारिष्ठ तरी त्यावेळी तुमच्या कोण्या नेत्यांमध्ये होते, ते सांगा. उगाच विकास कुडाळकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या बद्दल खोटे बोलून वाद करू नका. विकास कुडाळकर व संजय पडते हे दोन्ही तुमच्या पिंगुळी मतदार संघात तुमचे भाजपाचे अस्तित्व नष्ट करत आहेत. त्यामुळे तुम्ही सैरभैर झाले आहात. उमेश धुरी यांना राग येतो कारण पिंगुळी मतदार संघातून विकास कुडाळकर सारखा नेता सोडून गेला. साळगाव पं.स.व पिंगुळी पं.स.सदस्य पण आता सेनेकडे गेले. पिंगुळी मतदार संघात फक्त साळगाव ग्रामपंचायत भाजपाकडे असल्याने तुम्हाला जर पक्षाचा खूप मोठेपणा वाटत असेल, तर तो पुढील ग्रा.पं. निवडणुकीत तुमचे अस्तित्व संपवून दाखवून देऊ शिवसेना काय आहे, ती तेव्हा कळेल. आणि काँग्रेसमध्ये असताना तुमची पत्नी पं.स. सदस्य संजय पडतेंच्या हाताखाली काम करत होती तेव्हा तुम्हाला ते नेते चालत होते. संजय पडते हे जिल्हाप्रमुख आहेत. म्हणून तुम्ही एवढी घमेंड करू नका. कारण साळगाव मध्ये जि.प. निवडणुकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मतदानाची आकडेवारी लक्षात घ्या. कायम शिवसेनेलाच मते तुमच्या पक्षापेक्षा जास्त मिळाली आहेत. त्याचा विचार करा.
त्यामुळे पिंगुळी जिल्हा परिषद मध्ये भाजपा मधील तुमचे नेते आता काय करतात, आपल्या राजकीय अस्तित्वासाठी दुसऱ्या मतदार संघात का फिरतात व पिंगुळी जि.प. मतदार संघात तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवतात. जाता-जाता तुम्हाला सबुरीचा सल्ला देतो कि, शिवसेना विकास कुडाळकर यांना योग्य न्याय देईल, पण तुमच्या शब्दात तुम्हाला धडा शिकवला जाईल. एवढच सांगतो.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_