कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

प्रभु श्रीरामांचे मंदिर अयोध्येमध्ये होणे हा आपला स्वाभिमान आणि राष्ट्र अभिमान; लवु म्हाडेश्वर

▪️राष्ट्र उभारणीच्या देव कार्यात सर्वांनी सहभागी होऊया; म्हाडेश्वर यांचे प्रतिपादन

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१६: प्रभु श्रीरामांचे मंदिर अयोध्येमध्ये होणे हा आपला स्वाभिमान आणि राष्ट्र अभिमान आहे. अयोध्येमध्ये होणारे प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर हे राष्ट्र मंदिर झाले पाहिजे. यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न प्रत्येकाचा सहभाग अभियानामध्ये असणे आवश्यक आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळुन या राष्ट्र उभारणीच्या देव कार्यात सहभागी होऊया, असे प्रतिपादन श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाचे जिल्हा सहसंयोजक लवु म्हाडेश्वर यांनी केले.

राममंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या न्यासच्या माध्यमातुन अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरु झाले आहे. या राममंदिर निर्माणासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग लाभावा यासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुबारी या कालावधीत श्री राम मंदिर निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. यासाठी कणकवली येथील ओम साई कॉम्प्लेक्समध्ये कणकवली तालुक्याचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते फीत सोडुन आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक रविकांत मराठे, अभियानाचे जिल्हा सहप्रमुख लवु म्हाडेश्वर, संघाचे तालुका कार्यवाह सुदेश राणे, तालुका अभियान प्रमुख नंदकुमार आरोलकर, सहप्रमुख जितेंद्र चिकोडी, संदीप वालावलकर, संदीप राणे, इ. मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सुरसंचालन जितेंद्र चिकोडी यांनी केले तर आभार नंदु आरोलकर यांनी मानले.

यावेळी पुढे बोलताना लवु म्हाडेश्वर म्हणाले की, हिंदुचे खच्चीकरण करायचे असेल किंवा त्यांच्यावर सत्ता प्रस्थापित करावयाची असेल, तर त्यासाठी त्यांच्या श्रद्धा स्थानांवर घालावा लागेल. हेच परकीय आक्रमकांनी निश्चित केले आणि हिंदु समाजाच्या श्रद्धा स्थानावर त्यांनी आक्रमणे करण्यास सुरुवात केला. श्रद्धा स्थानांवर घाला केवळ मंदिरांपुरता मर्यादित नव्हता. तर हा घाला येथील हिंदुंच्या स्वाभिमानावरील हल्ला होता, त्यांच्या रास्त्राभिमानावरील घाला होता. आपल्या देशावर आक्रमणाचा इतिहास इसवी सन 500 पासुन सुरू होतो. मात्र सुरुवातीच्या लढाया आक्रमणे ही युद्धभुमीपर्यंत मर्यादित होती. मात्र मुघल आक्रमण घराघरापर्यंत पोचले. लुटमार, मंदिरांची नासधुस, महिलांवरील अत्याचार अशी काळी बाजु या आक्रमणांना होती. याच विकृत मनोरुत्तितुन बाबराने आयोध्या येथील श्रीराम मंदिर पाढले.

हे श्रीराम मंदिर पुनर स्‍थापनेसाठी तब्बल 76 लढाया झाल्या. यामध्ये लाखो राम भक्तांना आपले प्राण अर्पण करावे लागले. हे प्राणार्पण पारतंत्र्यात झाले असे नाही, तर स्वातंत्र्य काळातही राम जन्मभुमी मुक्तीसाठी राम भक्तांना आपल्या प्राणांचे त्याग करावे लागले. 1990 मधील करसेवेमध्ये हजारोच्या संख्येने राम भक्तांना गोळ्या घालुन मारण्यात आले. मात्र 1992 मध्ये श्रीराम भक्तांनी अयोध्येतील तो ढाच्या जमीनदोस्त केला आणि शेकडो वर्षांचा हिंदु समाजावरील कलंक पुसुन टाकला. आता प्रत्यक्ष श्रीराम प्रभुंच्या जन्मभुमीत भव्य मंदिर होत आहे. होणारे हे भव्य मंदिर राष्ट्रमंदिर व्हावे, यासाठी संतांचा प्रयत्न आहे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. व्यापक जनसंपर्क करून देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा या अभियानाच्या माध्यमातुन निश्चय केला आहे. आपणही सर्वजण कणकवली तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत सर्व विसरून केवळ श्रीमान राम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या न्यासाचे कार्यकर्ते आहोत. या भावनेने सर्वांत पर्यंत पोहोचुया आणि हे अभियान यशस्वी करू या.

यावेळी बोलताना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले की, मी स्वःत श्रीराम भक्त आहे. आयोध्या येथे श्रीराम मंदिर होणे हे आवश्यकच आहे. या साठी कणकवली शहरातुन आवश्यक ती सर्व मदत आपण करू. आपण सर्वांनी मिळुन हे अभियान यशस्वी करुया. उद्घाटनाच्या पुर्वी कणकवली शहरात भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत युवकांसोबत पुरुष मंडळी आणि विशेषतः लहान मुलंही सहभागी झाली होती.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!