कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

*धनगर समाजाच्या उपोषणाला भटक्या विमुक्त संघटनेचाही पाठिंबा

*धनगर समाजाच्या उपोषणाला भटक्या विमुक्त संघटनेचाही पाठिंबा*

*तालुका प्रमुख आनंद वरक यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी व तहसिलदारांना निवेदन*

सावंतवाडी : महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते पंढरपूर, लातूर, नेवासा या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी भटक्या विमुक्त संघटना तालुका प्रमुख आनंद वरक यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी,केसरी धनगरवाडी येथील जेष्ठ नागरिक धोंडी लांबर,केसरी माजी सरपंच दशरथ कोकरे,शितप वाडीतील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम जंगले,विलास जंगले, मंडळाचे उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील,भालावलचे सामाजिक कार्यकर्ते कोकरे उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी तसेच तहसीलदार, सावंतवाडी यांना सावंतवाडी तालुक्यातील भटक्या विमुक्त संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!