गणेशोत्सव स्पेशल गाड्यांचा लाखो प्रवाशांना लाभ
*🛑गणेशोत्सव स्पेशल गाड्यांचा लाखो प्रवाशांना लाभ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२४:-* गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणातील आपले गाव गाठत असतात. हेच लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत विशेष गाड्या सोडल्या होत्या. यावर्षी कोकण रेल्वे मार्गावर सर्वाधिक ३१० विशेष फेऱ्या धावल्या. त्याद्वारे लाखो प्रवासी मुंबई परिसरातून कोकणात दाखल झाले आणि कोकणातून परतही मुंबईला गेले, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.गणेशोत्सव आणि कोकण हे समिकरण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे प्रतिवर्षी जादा रेल्वेगाड्या सोडल्या जातात. एकीकडे नियमित गाड्यांची आरक्षणे मे महिन्यामध्येच ‘फुल्ल’ होत असल्याने या गणेशोत्सव स्पेशल गाड्यांच्या घोषणांची चाकरमानी वाट पाहत असतात. यावर्षी जुलै महिन्यापासूनच गणेशोत्सव स्पेशल गाड्यांची घोषणा होऊ लागली. गणेशोत्सव जवळ येईपर्यंत स्पेशल गाड्यांच्या घोषणा सुरूच होत्या. अगदी अनारक्षित गाड्याही सोडण्यात आल्या. ३ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या गणेशोत्सव स्पेशल गाड्या १९ सप्टेंबरपर्यंत सुरू होत्या. या कालावधीत तब्बल ३१० गणेशोत्सव स्पेशल गाड्या धावल्या. या गाड्या उघना, विश्वामित्री, सुरत, अहमदाबाद, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, एलटीटी, वांद्रे, पनवेल ते रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, मडगाव, सुरथकाल, मेंगलोर, ठोकुर अशा मार्गावर धावल्या. विशेष म्हणजे गाड्यांना कोकणातील बहुसंख्य स्थानकांवर थांबेही होते.
गणेशोत्सवात बसेस फुल्ल असतात, तर खासगी आराम बसचे दर परवडणारे नसतात. अशावेळी आर्थिक बाबीचा विचार करता चाकरमान्यांसाठी रेल्वे हाच महत्वाचा पर्याय असतो. रेल्वे प्रशासनानेही चाकरमान्यांचा विचार करून यावर्षी मोठ्या संख्येने विशेष गाड्या सोडल्याने चाकरमान्यां मधूनही समाधान व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

