नारुर महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम
*🛑नारुर महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२४:-* नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारुरच्या महालक्ष्मी मंदिरात विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. श्रावण मासानंतर नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता घटस्थापना होईल. त्यानंतर विविध धार्मिक विधी होतील. तसेच ३ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० वाजता श्री. मेस्त्रीबुवा (कालेली) यांची कीर्तने होणार आहेत. यात ३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा- मधुकैठब वध’, ४ रोजी ‘कृष्ण- रुक्मिणी स्वयंवर’, ५ रोजी ‘राम- रामभक्त केवट’, ६ रोजी ‘संतचरित्र-संत गोरा कुंभार’, ७
रोजी ‘अफझलखान वध’ आदी विषयांवर कीर्तने होणार आहेत. ८ व ९ रोजी जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ७००१ रुपये, द्वितीय ५७७७ रुपये, तृतीय ३७७७ रुपये, उत्तेजनार्थ २७७७ रुपये, तसेच वैयक्तिक पारितोषिके व प्रत्येकी चषक देण्यात येणार आहेत. १० रोजी सायंकाळी ७ पासून देवी महालक्ष्मीचा वार्षिक गोंधळ व जागरण कार्यक्रम, रात्री ८ वा. महाप्रसाद, ११ रोजी सायंकाळी ७.३० वा. गावातील सर्व शाळा व अंगणवाडीतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, १२ रोजी दुपारी २ वा. सीमोल्लंघन, रात्री ९.३० वा. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार मंडळ, नेरुरचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देवी महालक्ष्मी देवस्थान चार बारा गावकर मंडळी बहुमानकरी, महालक्ष्मी देवस्थान स्थानिक समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

