कुडाळशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल महामार्ग पुलावर दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून रस्त्याचे काम सुरु..

▪️ठेकेदार कंपनीचे नेमके चाललेय तरी काय; ग्रामस्थांमध्ये चर्चा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.१६: मुंबई-गोवा महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या कसाल बॉक्सवेल पुलावरून सध्या जेसीबी मशीन द्वारे पूर्वी केलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता पुन्हा खोदण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळे ठेकेदार कंपनीचे नेमके चाललेय तरी काय अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

नव्या पुलावरून गेले सहा-सात महिने वाहतूक सुरू आहे. अचानक गेल्या दहा-पंधरा दिवसापूर्वी कसाल पुलाची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. नंतर ती सुरू करून दुसरी लेन बंद करण्यात आली. मात्र, गेले आठ दिवस दोन्ही लेन बंद करून कसाल पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. संपूर्ण पुलावरची वाहतूक बंद केल्याने ही वाहतूक पूर्वीप्रमाणे सर्व्हिस रोडवरुन  वळवण्यात आली आहे. यामुळे सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय कसाल बस स्टॅन्ड समोरील ब्रिज खाली पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांमुळे सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. पुलावरून वाहतूक का बंद केली. याचा शोध घेतला असता पुलावरील रस्त्याच्या मधल्या भागाचा एक पट्टा खोदण्याचे काम चालू असून रस्त्याच्या मधोमध अंदाजे तीन फूट बाय एक फूट खड्डा खोदण्यात आला आहे. यात काँक्रीट टाकले जात आहे. याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. पुलाच्या बांधकामामध्ये काही दोष आहे का? की, पुलावरील रस्त्याच्या कामामध्ये काही दोष आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सिमेंट कॉंक्रीट रस्ता तब्बल दोनशे वर्षे टिकेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. तोच कॉंक्रीटचा केलेला रस्ता मशिनच्या साह्याने खोदण्याचे काम करण्यात येत आहे. हा रस्ता किती वर्षे टिकेल असाही प्रश्न लोकांमधून उपस्थित केला जात आहे.

याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र, त्या कामाची जोरदार चर्चा ग्रामस्थांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये सुरू आहे.

_*🔥हदयरोगावरील सर्व विनाशस्त्रक्रिया उपचारासाठी भारतातील उत्कृष्ठ प्रिव्हेटिव्ह कार्डिओलाॅजी सेंटर..🏥*_

*💥मंगळवार दि. १९ जाने. २०२१ रोजी..*
*💫सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण..*
*💫दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..*
♨️ (नावनोंदणी आवश्यक) ♨️

_🌈डॉ.जयवंत खबाले हृदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील.._

_🌈गेल्या २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार.._

_🤷🏻‍♂️बायपास टाळा.. ॲन्जिओप्लास्टी टाळा.. हृदयविकार टाळा.. निरोगी राहा..🤷🏻‍♀️_

*🏬 आमचा पत्ता ⬇️*
*🏥 शनिकृपा हार्टकेअर सेंटर*
⭕प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
⭕दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.

*💁🏻‍♂️ संपर्क ⬇️*
*📱9689008081*
*📱9960316318*

_⭕Arterian Therapy, EECP, Chelation Therapy, Vit-C Therapy, Ozone Therapy, Ayurveda._

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!