सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा मुंबईतील नामवंत संस्थाकडुन यथोचित गौरव..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.१६: रुग्णमित्र स्व.जितेंद्र तांडेल यांचे स्मरणार्थ मुंबईतील रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आठ सामाजिक संस्थानी नववर्षारंभी दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी सायन हाँस्पीटलमध्ये भरविलेल्या महा रक्तदान शिबिरात सिंधुदुर्गातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या संस्थेच्या रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मानपत्र देऊन यथोचीत गौरव करण्यात आला.
मुंबईतील रक्तदान व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रुग्णमित्र-रुग्ण कल्याण सेवा सामाजिक संस्था, युनिक ब्लड मोटीवेटर्स, जिवनदान सामाजिक संस्था, डोनेट अ लाईफ, थॕलेसेमिया निर्मुलन समिती महाराष्ट्र, जनता जागृती मंच, संडे फ्रेंडस् आणी ग्लोबल रक्तदाते या आठ संस्थांनी मिळुन रुग्णमित्र-रुग्णकल्याण सेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक स्व.जितेंद्र तांडेल यांचे स्मरणार्थ नववर्षारंभी दिनांक १ जानेवारी २०२१ ला मुंबईतील सायन हाॕस्पीटलमध्ये महा रक्तदान शिबिर भरविले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात कोरोना काळात जिवाची बाजी लावुन सामाजिक कार्यात धडाडीने कार्य केलेल्या २४ व्यक्ती व संस्थांचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान क्षेत्रात अनेक शिबिरे आयोजित करुन भरीव कार्य करणाऱ्या आणी १० लाखात ४ आढळुन येणाऱ्या बाँम्बे ब्लड गृपचे दाते अवघ्या काही हजारात चार दाते शोधुन काढुन बाँम्बे ब्लड गृपच्या बाबतची सिंधुदुर्गची श्रीमंती जगासमोर आणणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचाही यथोचीत गौरव करण्यात आला.
संस्थेच्या वतीने हा गौरव संस्थेचे सचिव श्री. किशोर नाचणोलकर व सदस्या सौ.कल्पना धुरी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन स्विकारला. माहीती अधिकार कार्यकर्ते श्री.अनिल गलगली यांचे हस्ते हा गौरव करण्यात आला.
यावेळी सर्वश्री विरेंद्र तांडेल, विनय शेट्टी, अजित वहाडणे, जयकुमार साटेलकर, विजय पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

