वैभववाडी तालुक्यात 12 ग्रामपंचायतची निवडणूक शांततेत; सरासरी 69.38 टक्के मतदान
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.15: तालुक्यात 12 ग्रामपंचायतची निवडणूक शांततेत पार पडली. तालुक्यात सरासरी 69.38 टक्के इतके मतदान झाले. सकाळच्या सत्रात धिम्यागतीने मतदान झाले. मात्र, दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. सर्वात जास्त मतदान सोनाळीत तर लोरे ग्रामपंचायतीसाठी कमी मतदान झाले.
तालुक्यातील सर्व 28 केंद्रावर दिवसभर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खांबाळे येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात काही काळ बिघाड झाला होता. मात्र, काही वेळातच मतदान सुरू झाले. एकूण 12 ग्रामपंचायतीच्या 103 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 33 जागा या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. 70 जागांसाठी 146 उमेदवार रिंगणात होते. त्या 146 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
झालेल्या मतदानाची गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, खांबाळे – एकूण मतदान -1349, झालेले मतदान – 934 (पुरुष 469, महिला- 465) सरासरी टक्केवारी -69.23, लोरे – एकुण मतदान – 1800, झालेले मतदान – 1214 (पुरुष -618,महिला-596) सरासरी टक्केवारी- 61.83, आचिर्णे- एकुण मतदान 1391, झालेले मतदान 996 (पुरुष 499, महिला-497) सरासरी टक्केवारी- 71.60, सांगुळवाडी- एकुण मतदान 333, झालेले मतदान – 249 (पुरुष-121, महिला -118) सरासरी टक्केवारी- 74.77, नाधवडे- एकुण मतदान – 1490, झालेले मतदान- 1022, सरासरी टक्केवारी -68.59, कोकिसरे – एकुण मतदान – 2149, झालेले मतदान – 1338, सरासरी टक्केवारी – 62.26, भुईबावडा- एकुण मतदान – 730, झालेले मतदान – 463, सरासरी टक्केवारी – 63.42, सोनाळी – एकुण मतदान – 833, झालेले मतदान – 662, सरासरी टक्केवारी – 79.47, एडगांव- एकुण मतदान- 718, झालेले मतदान – 563, सरासरी टक्केवारी – 78.41, वेंगसर – एकुण मतदान – 253, झालेले मतदान – 169, ( पुरुष -82, महिला -87), सरासरी टक्केवारी – 66.79, ऐनारी – एकुण मतदान – 387, झालेले मतदान- 280 (पुरुष – 137, महिला- 143) सरासरी टक्केवारी – 72.35. कुंभवडे – एकुण मतदान – 319, झालेले मतदान – 250, (पुरुष -126, महिला- 124) सरासरी टक्केवारी – 78.36 इतके मतदान झाले.
वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, तसेच पोलिस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांनी मतदान केंद्रांना भेटी देत पहाणी केली. मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सोमवार दि. 18 जानेवारी रोजी होणार आहे.
*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*
*🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*
_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._
*🤷🏻♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_