राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासन आणि महाविद्यालयात निवेदने..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह
🎴सिंधुदुर्ग,दि.१५: प्रजासत्तादिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिकाविषयी जागृती करणे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या आणि सनातन संस्था वतीने १६ जानेवारी या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाला आणि गटशिक्षण अधिकारी, तसेच माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र दुर्दैवाने याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशीच बहुतांश भारतियांना होते अन् या दिनी राष्ट्रध्वज मोठया अभिमानाने मिरवले जातात. हेच प्लास्टिकचे छोटे छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावर, कचऱ्यात, गटारात आदी ठिकाणी पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज तर लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पाहावी लागते. राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी हिंद जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (१०३/२०११) दाखल केली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले आणि त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले.
यंदा दुकानातून किंवा “ऑनलाइन” च्या माध्यमातून तिरंगा मास्क विकण्याचा प्रकार आढळून आला आहे , या तिरंगा “मास्क” मुळे राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही,’तिरंगा मास्क’ हे देशप्रेमाचे माध्यम नाही. ध्वजसंहिते नुसार ‘राष्ट्रध्वजाचा असा वापर करणे’ हा ध्वजाचा अवमानच आहे तसेच ‘राष्ट्र गौरव अपमान निवारण अधिनियम १९७१’ चे उल्लंघन आहे.त्यामुळे ‘तिरंगा मास्क’ ची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. कोरोना महामारीच्या काळात सामाजिक आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने ‘नागरिकांनी ‘मास्क’ वाफराने’ , ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे अशा प्रकारच्या सरकारी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. हे सुद्धा एक प्रकारचे राष्ट्रप्रेम आहे. त्या दृष्टीनेही विध्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जागृती करावी, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार चालू असताना हातातील ‘राष्ट्रध्वज’ जमिनीवर पडू नये, यासाठी अनेक लाट्या खाल्ल्या, अत्याचार सहन केले, राष्ट्रध्वजाची विटंबना होऊ नये, यासाठी क्रांतिकारकांनी प्रसंगी प्राणाचेही बलीदान दिले. असे असतांना लहान मुलांना खेळण्यासाठी, वाहनांवर लावण्यासाठी घेतलेले कागदी आणि प्लास्टिकचे झंडे, रस्त्यावर आणि नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात. पायदळी तुडवले जातात. यामुळे राष्ट्रध्वजासाठी बलीदान करणान्या क्रांतिकारकांची आणि अत्याचार सहन करणान्या देशभक्तांची करूर चेष्टाच केल्यासारखे आहे. तसेच काही जण तिरंग्याच्या रंगाप्रमाणे स्वतःचा चेहरा रंगवतात. काही जण राष्ट्रध्वजाच्या रंगातील कपडे घालून फिरतात, हेच कपड़े मळतात. खराब होतात, यांमुळेही राष्ट्रध्वजाचा अवमानच होतो. अशाकृतीमळे प्रजासत्तादिनी आणि स्वातंत्र्यदिनीच राष्ट्रध्वजाचा घोर अवमान सरसपणे केला जात आहे. तरी राष्ट्रध्वजाचा अवमान वा विटंबना होईल, अशा कृती नागरिक तसेच शाळेतील विद्याथ्यांकडून होऊ नये.
सावंतवाडी येथील पोलीस सहानिरीक्षक श्री. योगेश जाधव , तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे, यांना आणि देशभक्त शंकर राव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, पंचम खेमराज महाविद्यालय प्राचार्य डॉ. दिलीप भारमल , राणी पार्वतीदेवी माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय उपमुख्याध्यापक श्री. सदानंद धोंड यांना निवेदने देण्यात आले. यावेळी सर्वश्री. हिंदुजनजागृती समितीचे चंद्रकांत बिले, गणेश पेंढारकर उमाजी चव्हाण उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी येथे उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, पोलीस उपअधीक्षक श्रीमती गावडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. अशोक खडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर, यांना निवेदने देण्यात आली. यावेळी कसाल गावचे प्रमुख मानकरी श्री. यशवंत परब रवींद्र परब गजानन मुंज सुरेश दाभोळकर आदी उपस्थित होते.
देवगड येथील तहसीलदार श्री. मारुती कांबळे, पोलीस सहा. पोलीस निरीक्षक श्री. संजय कातिवले, स.ह. केळकर महाविद्यालयात प्राचार्या सौ. सुखदा जांभळे शेठ म.ग. हायस्कुल मुख्याध्यापक श्री. संजीव राऊत याना निवेदने देण्यात आले. यावेळी धर्माभिमानी युवक सर्वश्री अनिकेत माने, श्रेयस शाहाकार दीपक पाटील हिंदुजनजागृती समितीचे अनिरुद्ध दहिबावकर, अशोक करंगुटकर आदी उपस्थित होते.
मालवण येथील तहसीलदार सुधिर सुभाष पाटील, स.का. पाटील महाविद्यालय, आणि अ.शि.दे. टोपीवाला हायस्कुल प्राचार्य मिलिंद अवसरे यांनाही निवेदन देण्यात आले.
यावेळी येथील पोलिस निरीक्षक एस.एस.ओटवणेकर आणि पोलीस उपनिरीक्षक श्री फार्णे यांनी नगर परिषद,तसेच सर्व ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील यांना समवेत घेऊन राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी साठी योग्य ते नियोजन करण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलीस निरीक्षक एस.एस. ओटवणेकर यांनी आपण नगर जिल्ह्यामध्ये मध्ये असताना ध्वज सन्मानाविषयी राबवलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ध्वज विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना १४९ ची नोटीस देऊन ध्वज सन्मान अभादित राखणार असल्याचेही सांगितले.
प्रजासत्ताक दीना निमित्त लवकरच एक बैठक घेण्यात येणार असून ह्याविषयी आपण ध्वज सन्माना विषयी मार्गदर्शन करणार असल्याचेही सांगितले. यावेळी हिंदूजनजागृती समिती करत असलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कणकवली येथील नायब तहसीलदार श्रीम.संगीता पाटील पोलीस निरीक्षक संजय धुमाळ शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र चाैगुले यांना निवेदने देण्यात आले.
यावेळी सनातन संस्थेचे सर्वश्री सुर्यकांत मालवणकर, श्रीधर मुसळे, हिंदुजनजागृती समितीचे विष्णू कदम आदी उपस्थित होते.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_