शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सुनील पेडणेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे केलेला अर्ज विशेष जिल्हा न्यायालयाने फेटाळला..

▪️अँड. बापू गव्हाणकर आणि त्यांच्या सहाय्यक अँड. मिता परब यांनी सुनील पेडणेकर यांची न्यायालयाकडे मांडली सक्षमपणे बाजू..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१५: नकुल पार्सेकर यांच्या जातीवादी गुन्हा प्रकरणात सुनिल पेडणेकर पोलिसांना सहकार्य करत नाहीत. मोबाईल देत नाहीत. या कारणासाठी त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके यांनी न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली होती. यावर न्यायालयाने कडक शब्दात समज देत अशाप्रकारे कुठची कायद्यात तरतूद नसताना अर्ज दाखल करणे म्हणजे अज्ञान प्रकट करण्यासारखे आहे. असे सुनावून सरकारी पक्षाने सादर केलेला अर्ज फेटाळून लावला.

सुनील पेडणेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज जिल्हा विशेष जिल्हा न्यायालयाकडे सादर करुन जामीन अर्ज रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते.

माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांचे वकील अँड. बापू गव्हाणकर व त्यांच्या सहाय्यक अँड. मीता परब यांनी विविध वरिष्ठ न्यायालयाने दिलेल्या रुलींग [ निर्णयांचा ] पूरावा सादर करुन सरकारी वकील व तपासी पोलिस अधिकारी डॉ. रोहीणी सोळंके यांनी केलेली मागणी कशी आयोग्य आहे. हे न्यायालयापूढे पटवून दिले.

जिल्हा विशेष न्यायालयाचे न्यायाधिश प्रकाश कदम यांनी सरकारी वकीलांची या अर्जावर सुनावणी सुरु असताना चांगलीच हजेरी घेत कानउघाडणी करीत मोबाईल जप्त करण्यासाठी जामीन रद्द करण्यासाठी केलेला अर्जच बेकायदेशीर ठरवित न्यायकक्षेत बसत नसलेल्या अर्जावर न्यायालयाकडे अर्ज करुन कायद्याचे अज्ञान कसे प्रगट करण्यात आले. याबाबत अर्जदार पोलिस अधिकारी डॉ. रोहीनी सोळंके यांना कदाचित कायदा समजत नसेल तर सरकारी वकीलांनी कायदा न्यायालयाकडूनच सरकारी वकीलांना देत सुनील पेडणेकर यांच्यावतीने अँड. मीता परब यांनी केलेला तोंडी युक्तीवाद व अँड. बापू गव्हाणकर यांनी केलेला लेखी युक्तीवाद मान्य करीत न्यायालयाने मोबाईल जप्त करण्याच्या कीरकोळ कारणासाठी सुनील पेडणेकर यांचा जामीन रद्द करण्यासाठी केलेला तपासी पोलिस अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ. रोहीणी सोळंके यांचा अर्ज फेटाळून लावला.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!