आणखी

खेड येथे निरंकारी साधा विवाह पद्धतीने विवाह संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१५: सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपेने खेड येथील पाटीदार भवन हॉलमध्ये  चि. गणेश कासार व चि.सौ.का. प्रतीक्षा साळवी यांचा शुभविवाह शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत निरंकारी साधा विवाह पद्धतीने नुकताच संपन्न झाला. यावेळी अनेक निरंकारी भक्त व समाजातील गणमान्य जण उपस्थित होते.

युवा ज्ञान प्रचारक महात्मा विजय विचारेजी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झालेल्या या विवाह समारोहात प.पू.विजय विचारे यांनी आपल्या विचारात म्हटले,की  ज्या साधेपणा मध्ये हा विवाह संपन्न होत आहे.तो साधेपणा आपल्या जीवनात कसा येईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सुखी होण्यासाठी ज्या साधेपणाची गरज आहे तो साधेपणा सद्गुरूच्या कृपेने प्रभू परमात्म्याची प्राप्ती केल्यानेच येतो मग तो साधेपणा कुठे शोधावा लागत नाही.

पुढे विजय विचारे म्हणाले, की  प्रभूची प्राप्ती केल्यावर माणसाचा दृष्टीकोन विशाल होतो.तो समानतेच्या नजरेने सर्वांकडे बघू लागतो.हाच गुण समाजाला सशक्त व सुखी करतो त्यामुळे समाजामध्ये वैचारिक समानता येते. अशा अंतरीच्या भावना महात्मा विजय विचारेजी यांनी प्रकट केल्या.

या विवाह समारोहमध्ये  चिपळूण क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक महात्मा गंगाधर विचारे, चंद्रकांत जाधव-मुख्य संपादक संत निरंकारी पत्रिका मराठी तसेच रत्नागिरी सेक्टरचे संयोजक रमाकांत खांबे व रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रबंधक महात्मा मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी खेडचे मुखी बळीराम शिंदे आणि सेवादल युनिट क्रमांक८९३ चे मोलाचे योगदान लाभले.या विवाह सोहळ्याचे सुत्रसंचलन विजय मडगावकर यांनी केले.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!