🛑 अक्षय साईल याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी ; महेश सारंग
🛑 पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांच्या कडे निवेदनाद्वारे केली मागणी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी ,दि -०६ :-
कै अक्षय साईल या युवकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या नराधमानवर कायद्याने कठोर कारवाई करून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपचे युवा नेते माजी उपसभापती, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,कोलगाव येथील बाळा राऊळ उपस्थित होते.
कोलगाव येथील महाविद्यालयीन युवक अक्षय जर्नादन साईल याला त्याचा मीत्र प्रशांत पडते यांनी आपले मुंबई हून मित्र येणार आहेत त्यांना फिरण्यासाठी भाड्याने गाडी पाहिजे तू जरा बघून दे असे सांगितले,अक्षय याने आपल्या ओळखिचा असलेला अजीत मठकर याला भाड्याने गाडी पाहिजे असे सांगितले त्याने आपली गाडी दिली ही गाडी घेऊन परवेज शेख तेजस पोतदार,संकेत सलील सय्यद माळी,शामू,प्रशांत पडते, प्रशांत पवार फिरायला गेले व गाडीचा कुडाळ मध्ये अपघात झाला त्या अपघातात गाडीचे झालेले नुकसान आपण इन्शुरन्स क्लेम करुन भरुन देतो तक्रार वैगरे करु नको असे परवेज ने सांगितले व शेवटी पलटी मारली,गाडी मालक अजीत मठकर यांने माझी गाडी तू ठरवलीस नुकसान भरपाई तूच द्यायला पाहिजे असा तगादा लावून दमदाटी करून सुमारे पाच लाख रुपये वसूल केले,ते पैसे वसूल झाल्यावर त्यांची मागणी वाढली ते अजून अडीच लाख मागू लागले ते पैसे अक्षय देत नाही म्हणून त्याला जबर मारहाण करण्यात आली.या माराला घाबरून त्याने आपल्या बहिणीच्या खात्यातील सत्तर हजार काढून त्यांना काढून दिले हे सर्व होत असताना तो मानसिक दृष्ट्या पूर्ण पणे खचून गेला होता असे महेश सारंग यांनी पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गाडीच्या अपघाताचे निमित्त करून अजीत मठकर व त्याचे साथिदार जे अवैध धंद्याशी संबंधित आहेत असे वारंवार शारिरीक व मानसिक त्रास देऊन पैशाची मागणी करू लागले ही सर्व मंडळी, आडदांड अविचारी व अवैध धंद्याशी संबंधित असल्याने अक्षय पुरता घाबरून गेला होता व त्याचा त्या अपघाताशी काडीमात्र संबंध नव्हता असे निवेदनात म्हटले आहे.
अपघाताचा बनाव रचून अक्षय साईल याच्या कडून पैसे लुटण्याचा प्लॅन या बारा जणांनी करून अक्षय याचा बळी घेतल्याचा संशय निवेदनातून व्यक्त केला आहे, त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करुन गुंड प्रवृत्तीच्या मारेकऱ्यांना जेरबंद करावे व त्यांच्यावर भारतीय न्यायव्यवस्थेतील सगळ्यात कडक कलमे लावून कारवाई करावी अशी मागणी महेश सारंग यांनी केली आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

