कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिक

आचरा येथे २० ऑक्टोबरला बाल कथाकथन महोत्सव

*🛑आचरा येथे २० ऑक्टोबरला बाल कथाकथन महोत्सव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आचरा, दि-०५:-* आचरा येथे प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरीद्वारा ‘बिड्ये विद्यामंदिर आचरा नंबर १’ येथे २० ऑक्टोबर रोजी बाल कथाकथन महोत्सव साजरा होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र-शाखा आचरा आणि साने गुरुजी कथामाला शाखा मालवण या संस्थांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता बँक ऑफ महाराष्ट्रच्या रत्नागिरी झोनचे मॅनेजर सागर नाईक यांच्या हस्ते आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे आचरा शाखाधिकारी सिलंबू अरुमुगम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ‘मालवण कथामाला’ अंतर्गत शाळेतील तिसरी ते आठवीपर्यंतची मुले यात सहभागी होणार आहेत. इयत्ता तिसरी व चौथीसाठी ‘श्यामची आई’ या पुस्तकातील कथा, पाचवी व सहावीसाठी ‘एक समाज सुधारक’ विषयावर कथा, तर सातवी व आठवी या गटासाठी ‘संस्कार कथा’ असे विषय असून प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५००, ३०० व २०० रुपये पारितोषिक देण्यात येईल. आपल्या कथानिवेदक स्पर्धक विद्यार्थ्यांची नावे २ ऑक्टोबरपूर्वी स्पर्धा संयोजक समितीकडे द्यावीत, असे आवाहन सुगंधा गुरव (९४२००७८५१९) यांनी केले आहे. पारितोषिक वितरण २० ऑक्टोबर रोजी कथामाला सल्लागार समिती सदस्य प्रकाश पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कथामाला मालवण सल्लागार समिती सदस्य सदानंद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!