कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी अँड सौ. रेवती गवस- कदम

*🛑मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी अँड सौ. रेवती गवस- कदम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३०:-* झोळंबे गावची कन्या तर देवगडची स्नुषा अँड सौ. रेवती गवस- कदम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती झोळंबे गावची कन्या अँड सौ. रेवती सुधाकर गवस आणि आता देवगडची स्नुषा सौ. रेवती वैभव कदम हिची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी (पि ए) नियुक्ती झाली आहे. राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अँड सौ. रेवती गवस – कदम यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. बीकॉम एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या अँड सौ. रेवती गवस – कदम यांनी चार वर्षे सिटी सिव्हिल कोर्टात हायर स्टेनो म्हणून काम केले. या परीक्षेला संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २००० उमेदवार परीक्षेस बसले होते. त्यातुन पहिल्या दोन परिक्षेत १६० उमेदवार निवडण्यात आले. दुसऱ्या परीक्षेसाठी ३६ उमेदवार निवडण्यात आले. तर शेवटच्या तिसऱ्या परीक्षेसाठी १५ उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात अँड सौ. रेवती गवस – कदम यांचा ९ वा क्रमांक आला.अँड सौ. रेवती गवस – कदम यांचे पती वैभव कदम इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून ते आर. बी. एल. बॅकेत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. वडील सुधाकर गोपाळ गवस हे ठाणे न्यायालयातुन ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. अँड सौ. रेवती गवस – कदम यांना वडिलांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तर छोटी बहीण कु.भाग्यश्री गवस ही वकील असुन तिने दोन वर्षे वकिली केल्यानंतर सध्या ती एच. डि. एफ. सी. बॅकेत आहे. आई सौ. सुजाता यांनी अँड सौ. रेवती गवस – कदम यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी खुप मेहनत घेतली. पुढील शिक्षणासाठी वडीलांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दोन्ही मुली अभ्यासात हुशार असून निश्चित ध्येय गाठण्यासाठी त्यांच्या कठीण परिश्रम घेण्याची चिकाटी आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!