गणेश मूर्तीशाळांमध्ये रात्री गजबजू लागल्या
*🛑गणेश मूर्तीशाळांमध्ये रात्री गजबजू लागल्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴न्हावेली, दि-३०:-* अवघ्या दहा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील परंपरागत मूर्तिकारांच्या शाळा रात्री गजबजू लागल्या आहेत. जुलै महिन्यात पावसाचे दमदार आगमन झाल्यानंतर आता शेतीची कामे ओटोपून मूर्तिकारांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. अवघे काही दिवस राहिल्याने सध्या गणेश मूर्तिशाळांमध्ये मूर्ती रंगकाम करण्याची लगबग सुरू झाली आहे.
बाप्पाचे आगमन होणार असल्याने जिल्ह्यातील गावोगावच्या पारंपरिक गणेश मूर्ती शाळांमध्ये गजबजाट सुरू आहे. काही मूर्तिकारांनी पेण येथील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मे महिन्यापासून आणून ठेवल्या आहेत. मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यात भक्तांच्या आवडीतप्रमाणे साच्यातील व हाती गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकार मेहनत घेत आहेत. पारंपरिक मातीबरोबर शाडू मातीला मागणी वाढली असून किमतीत वाढ झाली आहे. सध्या मातीच्या मूर्तीना पारंपरिक रंगकाम सुरू असले, तरी हिरेजडीत मूर्ती, कापडी वस्त्रं अशा अनेक नवनवीन कलाकुसरी करण्याकडे कल दिसत आहे. रंग व अन्य साहित्याच्या किंमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. कामगारांच्या मजुरीचे दर वाढले असले, तरी कुशल कारागिर मिळणे कठीण झाले आहे. त्यात अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडला असला, तरी पारंपरिक मूर्तिकार आजही हा व्यवसाय टिकवून आहेत. जिल्ह्यात गावोगावी गणेश मूर्तिशाळा असून मूर्तिकार माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत सर्व कामे कुटुंबियांसह करताना दिसत आहेत. काही मूर्तिकारांची मुंबईस्थित घरातील मंडळीही काही दिवसांत दाखल होणार आहेत. त्यात सध्या पेणमधील गणेश मूर्तीसह शाडूच्या मातीच्या मूर्तीना मागणी वाढत आहे. मात्र, इंधन दरवाढ, कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत. मूर्तिकार गणेश मूर्तीशाळांमध्ये रात्रं-दिवस कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

