कोकणदोडामार्गमहाराष्ट्र

दिव्यांग मुलांसाठी स्कूल बस उपलब्ध करा !

*🛑दिव्यांग मुलांसाठी स्कूल बस उपलब्ध करा !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-३०:-* तालुक्यातील दिव्यांग मुलांसाठी स्कूल बस द्यावी, अशी मागणी उसप येथील जय भवानी युवा प्रतिष्ठानचे बळीराम नाईक, प्रवीण गवस, नीलेश गवस, संदेश सडेकर व चंद्रकांत मळीक यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, दोडामार्ग तालुक्यात अनेक दिव्यांग मुले आहेत. त्यांच्यासाठी कोणतीही शिक्षणाची सोय नाही. जवळ पास दोडामार्ग तालुक्यातून १० मुले रोज केशव सेवा साधना डिचोली-गोवा येथील कॉलेजला जात आहेत. परंतु तेथे दोडामार्गहून ये-जा करण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने त्यांची परवड होत आहे. कित्येक दिव्यांग मुले प्रवासाची सोय नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. जे जागृत पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी डिचोली येथे घेऊन जातात, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या मुलांसाठी स्कूल बसची सोय झाल्यास दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठी सोयीचे होणारे आहे. दोडामार्ग तालुक्यात दिव्यांग मुलांसाठी विशेष शाळा सुरू करावी, अशी मागणी या मुलांच्या पालकांकडून होत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील दिव्यांग मुलांसाठी स्कूल बस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जय भवानी युवा प्रतिष्ठानने मंत्री केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!