शासन जीआरनुसार ग्रामसेवकांनी काम करावे
*🛑शासन जीआरनुसार ग्रामसेवकांनी काम करावे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-३०:-* तालुक्यातील ग्रामसेवक हे शासनाच्या जीआरनुसार काम करत नाहीत. इमारत बांधकाम कामगारांच्या पुनर्तपासणीसाठी आलेल्या अर्जावर ग्रामसेवक सही करण्यास नकार देत आहेत. हे तात्काळ थांबवून शासनाच्या जीआरनुसार कार्यवाही न झाल्यास कामगारांना घेऊन आंदोलन करणार, असा इशारा बांधकाम कामगार कल्याणकारी संघ, सिंधुदुर्गच्या संचालक सदस्या जेनिफर लोबो व दीपक जाधव यांनी दोडामार्ग गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ५ फेब्रुवारी २०२४ च्या जीआरनुसार आवश्यक कार्यवाही सकारात्मकतेने करण्याचे निर्देश सर्व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
यांना द्यावेत. तसे केल्याबाबत जिल्हा कामगार कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयास कळविण्यात यावे. तसेच कोणत्याही तक्रारी उद्भवल्यास त्या तक्रारींचा निपटारा गटस्तरांवर करण्यात यावा. १३ ऑगस्ट २०१४ अन्वये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्थी) नियम, २००७ च्या नियम ३३ (३) प्रमाणे संबंधित ग्रामसेवकांमार्फत ग्रामपंचायतीच्या बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी ९०० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात यावे. हे प्रमाणपत्र देताना कामगारांच्या वास्तव्याचा अधिकृत पुरावा व अधिकृत फोटो असलेल्या ओळखपत्राचा नमूना अर्जासोबत घेण्यात यावे व सोबत जोडलेल्या नमून्यानुसार ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. असे असताना ग्रामसेवक शासन निर्णयाला जुमानत नाहीत व शासन आचारसंहिता पालन करत नाहीत. हा शासन तसेच कायद्याचा अपमान आहे. आपल्या कामाचा मोबदला शासनाकडून घेऊन शासनाचे काम नाकारणे याचा अर्थ काय होतो? याचे उत्तर कामगारांना मिळणे अपेक्षित आहे. जोपर्यंत सही न देण्यासाठी शासनाचा आदेश येत नाही, तोपर्यंत ग्रामसेवकांना सही देणे बंधनकारक आहे. त्यामुळे ग्रामसेवक व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची येत्या दोन दिवसांत संयुक्त बैठक बोलावून त्यावर तोडगा काढावा. अन्यथा कामगारांना सोबत घेत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा लोबों व जाधव यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांना दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
