कणकवलीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

गणेशोत्सवात परतीच्या प्रवासाला एसटीच्या ७८ गाड्या आरक्षित

*🛑गणेशोत्सवात परतीच्या प्रवासाला एसटीच्या ७८ गाड्या आरक्षित*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-३०:-* गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असला, तरी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस बुकिंगलाही प्रवासी पसंती देत आहेत. कोकणातील सर्वात मोठा सण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी आतापर्यंत ४३०० गाड्या कोकणसाठी बुक झाल्या आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागातून १३८ गाड्या ठेवण्यात आल्या असून त्यातील ७८ गाड्या आरक्षितही झाल्या आहेत, अशी माहिती रा. प. म. चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी दिली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात रेल्वे, एसटी बसेस, खासगी बसेसच्या माध्यमातून दाखल होतात. यात मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्हयात येतात. या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रा. प. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने जय्यत तयारी केली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी कोकण विभागासाठी आतापर्यंत ४३०० एसटी गाड्या आरक्षीत झाल्या आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्गमधून १३८ गाड्या आगावू आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आतापर्यंत ७८ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. तसेच ४० प्रवासी एकाच ग्रुपने उपलब्ध झाल्यास ग्रुप बुकिंगचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!