कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

बांदिवडे खुर्द, तळवडे, कलंबिस्त सरपंचांना क्लीन चिट

*🛑बांदिवडे खुर्द, तळवडे, कलंबिस्त सरपंचांना क्लीन चिट*

*🛑कोकण विभागीय आयुक्तांकडून दोषी ठरवता येणार नसल्याचा निष्कर्ष*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-३०:-* कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे सरपंच वनिता मेस्त्री, कलंबिस्त सरपंच, उपसरपंच व आठ सदस्य तसेच मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द-उपसरपंच तथा प्रभारी सरपंच अरविंद साटम यांना कोकण विभागीय आयुक्तांकडून क्लीन चिट मिळाली आहे. या तिघांविरुद्धचे कारवाईबाबतचे अर्ज चौकशीअंती फेटाळून लावण्यात आले आहेत.
ग्रामसभेच्या ठरावाविरोधात जात वीज वितरण कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याचे पत्र तळवडे सरपंचांनी वीज वितरण कंपनीला दिले असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. ग्रामपंचायत कलंबिस्तच्या असेसमेन्ट नोंदवहीत नोंद असलेल्या बालवाडी इमारतीचे छप्पर बदलून नुकसान केल्याची तक्रार पोलिसांत दाखल असताना त्याचा पाठपुरावा ग्रामपंचायतीने केलेला नाही. तसेच सद्यस्थितीत ही इमारत कोसळल्याने इमारत जतन करण्याबाबतची जबाबदारी दुर्लक्षित केल्याने सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी कर्तव्यात कसूर केल्याची तक्रार करण्यात आली होती.
*ग्रा. पं. अधिनियमांचा भंग*
बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च न केल्याने ग्रामपंचायत अधिनियमांचा भंग केला. जलजीवनचा प्रस्ताव मंजूर असताना सादर न करणे. आर्थिक व्यवहारात अनियमितता असणे, आदी बाबींची तक्रार करण्यात आली होती. या तीनही ग्रामपंचायतींच्या झालेल्या सुनावणीत कोकण आयुक्तांनी नोंदविलेल्या निष्कर्षात त्यांना दोषी ठरवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!