कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

गिरणी कामगारांना घरे बांधून देण्याबाबत सरकार टोलवाटोलवी करत आहे; घरं जमत नसेल तर प्रत्येक कामगाराला ८० लाख द्या ..

*🛑 गिरणी कामगारांना घरे बांधून देण्याबाबत सरकार टोलवाटोलवी करत आहे; घरं जमत नसेल तर प्रत्येक कामगाराला ८० लाख द्या ..*

*🛑 सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघटनेच्या बैठकीत कामगारांनी केली मागणी ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* मुंबईतील गिरणी बंद होवून जवळपास ४२ वर्ष उलटून गेली. सरकारने घरं देणार म्हणून घोषणा, निर्णय घेतला आहे. मात्र कामगारांना घरे बांधून देण्याबाबत सरकार टोलवाटोलवी करत असल्याने हयातीत घरे मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकारने घरा ऐवजी प्रत्येक कामगाराला ८० लाख रुपये द्यावे आणि ज्यांना घरं पाहिजे त्यांना घरे बांधून द्यावीत अशी अपेक्षा सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघटनेच्या बैठकीत कामगारांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघटनेची बैठक काझी शहाबुद्दीन हाॅल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष शामसुंदर कुंभार, खजिनदार लाॅरेन्स डिसोझा, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, विश्वनाथ कुबल,अभिमन्यू लोंढे, सुमन मुळीक, घनश्याम शेटकर आदी उपस्थित होते. गिरणी कामगारांना शिल्लक असलेला व्हीआरएस मिळणार आहे. त्यांनी राष्ट्रीय मिल मजदुर संघाच्या कार्यालयात संपर्क साधावा. तसेच घरांची सोडत निघणार आहे. पण तारीख पे तारीख दिली जात आहे. मात्र घरं दलालांच्या घशात घालू नका असे आवाहन करण्यात आले. दलाल मोठ्या प्रमाणात पैसा उकळत आहेत. त्यामुळे घर मिळुन ही आर्थिक दृष्ट्या परवडत नाही असे काही कामगार म्हणाले.
गिरणी कामगारांचा सन १९८१-८२ मध्ये संप झाला. आता जवळपास ४२ वर्ष झाली. काही गिरणी कामगारांनी पाठपुरावा करत देह ठेवला तर काही गिरणी कामगार चालू शकत नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. सरकारच्या टोलवाटोलवी मुळे केव्हा घर मिळतील.हा प्रश्न पिढ्यानपिढ्या चालत राहिलं असे अनेक प्रश्न गिरणी कामगार व वारसांना पडले आहेत. त्यामुळे मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घरं मिळतील त्यांची किंमत पाहता ज्यांना घरं नको त्यांना प्रत्येकी ८० लाख रुपये द्यावे आणि घरं पाहिजे त्यांना घरे बांधून द्यावीत अशी मागणी आज करण्यात आली. या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री दिपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, राष्ट्रीय मिल मजदुर संघ आदींना निवेदन द्यावे असे ठरविण्यात आले. यावेळी आनंद राऊळ, रमेश देसाई, रामचंद्र राऊळ, गणेश सावंत, महादेव गावडे, प्रकाश राऊळ, महादेव मयेकर, रवींद्र पेडणेकर, माधवी भोगण, प्रसाद गावडे, दाजी खानोलकर, रत्नप्रभा तेली, नेहा परब, सविता सावंत, मुकुंद नाईक, शंकर मिसाळ यांच्यासहित गिरणी कामगार व वारस उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेची बैठकीत उपस्थित शामसुंदर कुंभार, लाॅरेन्स डिसोझा, रामचंद्र कोठावळे, सुभाष परब, विश्वनाथ कुबल आदी
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!