कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून पुतळ्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालं आहे का ? – अर्चना घारे – परब यांचा सवाल

*🛑शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून पुतळ्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झालं आहे का ? – अर्चना घारे – परब यांचा सवाल*

*🛑दोशींवर कडक कारवाई करा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* सिंधुदुर्गातील मालवण मध्ये राजकोट येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल याची जनतेला खात्री असते. विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे.

गडपती शिवरायांनी खळाळत्या समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग साडेतीनशे वर्षानंतरही आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यांचा चिरानचिरा शिवाजी महाराजांच्या आणि हे गड किल्ले बांधणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देत आहेत.

महाराजांचा संपूर्ण पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे. शिवछत्रपतींचे स्मारक हे घाई गडबडीत तयार करून पुतळ्याच्या सौंदर्य आणि गुणवत्ता याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे का ? या घडलेल्या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अश्या तीव्र शब्दात कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनी देखील याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.

तरी सदर वृत्तास आपल्या प्रसिद्ध दैनिकात प्रसिद्ध द्यावी ही नम्र विनंती.

कळावे आपली,
अर्चना घारे परब
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!