कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा

*🛑तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा !*

*🛑माडखोल ग्रामस्थांची निवेदनातून मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* माडखोल-मेटवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका गोठ्यात गळफास घेत सातारा-पाटण येथील देविदास विठ्ठल रांजणे (४२) या तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करावा, अशी मागणी माडखोल ग्रामस्थांनी सोमवारी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेऊन केली. तसे निवेदन देण्यात आले. ज्या ठिकाणी देविदास हा मोडक यांच्या बागेत कामाला होता, त्या बागेपासून काही अंतरावर असलेल्या नाईक यांच्या शेतमांगरात देविदास याने गळफास घेत आत्महत्या केली होती. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र, या आत्महत्या प्रकरणात ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला असून पोलीस यंत्रणेने सखोल तपास करावा, अशी मागणी केली. पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी
सांगितले की, या घटनेनंतर मृत देविदास रांजणे याचे नातेवाईक सावंतवाडी आले होते. देविदास हा कामाला पुणे येथे जातो, असे सांगून गेला. मात्र, तो माडखोलला आला हे आम्हाला माहिती नव्हते, असे त्यांनी सांगितले. त्याच्या मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. मृत व्यक्तीजवळ मजकूर लिहिलेला कागद सापडला. त्यादृष्टीने तपास केला जाईल. मृताचे नातेवाईक व ग्रामस्थ यांच्यासमोर चर्चा केल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र, देविदास याचा मृत्यू गळफास लावून घेतल्यानेच झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट नमूद आहे.
यावेळी माडखोल ग्रामस्थ राजकुमार राऊळ, बाबल आल्मेडा, प्रमोद बंड, दीपक नाईक, विनायक राऊळ, आजगावकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!