कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

*🛑तरुणाची गळफास घेत आत्महत्या*

*🛑इन्सुली-कुडवटेंब येथील घटना*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-२७:-*. इन्सुली-कुडवटेंब येथील तरुणाने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. भास्कर अमृत सावंत (४१) असे त्याचे नाव आहे. त्याने हा प्रकार नैराश्येतून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. याबाबतची खबर त्याचा भाऊ सखाराम अमृत सावंत यांनी बांदा पोलिसांत दिली. भास्कर सावंत याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुडवटेंब येथे राहणारा भास्कर हा चालक म्हणून काम करत होता. सोमवारी सकाळी काहीवेळ घराबाहेर येऊन तो पुन्हा घरात गेला होता. मात्र, नेहमी बाहेर बसणारा भास्कर दरवाजा बंद करून घरातच राहिल्याने शेजारच्यांना संशय आला. त्यांनी त्याला हाक मारली. मात्र, आतून प्रतिसाद न आल्याने याबाबतची माहिती त्यांनी त्याच्या भावाला दिली. काही वेळात भाऊ घरी आला. त्याने पाठीमागून जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा स्वयंपाकघरात भास्कर गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह विच्छेदन करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!